advertisement

निसर्गाचा प्रकोप! भूकंप आणि त्सुनामीचा हाहाकार! २० वर्षांतली सर्वात मोठी हानी, एका झटक्यात 250 नागरिकांचा मृत्यू

Last Updated:

सुमात्रा बेटावर ७.२ रिश्टर भूकंप व त्सुनामीमुळे मध्य तपनौली जिल्ह्यात भीषण हानी, २४८ मृत, शेकडो जखमी, हजारो बेघर, मदतकार्यात अडचणी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.

News18
News18
जिथे आठवणी, प्रेमाने घराच्या भिंती रंगवल्या सजवल्या होत्या त्या आठवणी पुन्हा एकदा नेस्तनाबूत झाल्या आहेत. जे घडलं ते गेल्या 20 वर्षांत फार भयंकर होतं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आधी भूकंपानं नुकसान झालं मग त्सुनामी आणि महापुरानं सारं काही वाहून नेलं. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आलेल्या शक्तीशाली भूकंप आणि त्यानंतरच्या त्सुनामी यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात हाहाकार उडाला आहे.
शनिवार संध्याकाळपर्यंत मृतांची अधिकृत संख्या २४८ पर्यंत पोहोचली आहे, पण अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, ढिगाऱ्यांखाली अजूनही अनेक मृतदेह आढळण्याची शक्यता असल्याने हा आकडा अजून वाढू शकतो. या दुर्घटनेत शेकडो लोक जखमी झाले असून, हजारो नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाल्याने ते बेघर झाले आहेत. या आपत्तीचा सर्वात मोठा फटका उत्तर सुमात्रा प्रांतातील मध्य तपनौली जिल्ह्याला आणि आसपासच्या भागांना बसला आहे.
advertisement
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ इतकी प्रचंड होती. या धक्क्यानंतर समुद्रात उंचच उंच लाटा उठल्या आणि त्यांनी किनाऱ्यावरील अनेक गावांना क्षणात आपल्या कवेत घेतले. अनेक घरे, शाळा, रुग्णालये आणि रस्त्यांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. भूकंपामुळे वीज आणि दूरसंचार व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे प्रभावित भागांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे. या भीषण परिस्थितीत बचावकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत.
advertisement
पावसामुळे चिखलमय झालेले रस्ते आणि अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे मदत पथकांना प्रभावित गावांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाहीये. अनेक महत्त्वाचे पूल तुटल्यामुळे मदतकार्य पोहोचू शकत नाही. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, काही दूरच्या गावांमध्ये अजूनही कोणताही संपर्क झालेला नाही आणि तिथे परिस्थिती आणखी गंभीर असण्याची भीती आहे. इंडोनेशियाई लष्कर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सी आणि स्वयंसेवी संस्थांचे जवान दिवस-रात्र बचावकार्य करत आहेत.
advertisement
इंडोनेशिया देश प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या संवेदनशील क्षेत्रावर स्थित आहे, ज्यामुळे इथे भूकंप आणि ज्वालामुखीचा धोका नेहमीच असतो. २००४ सालची विनाशकारी त्सुनामी, २०१८ चा सुलावेसी भूकंप-त्सुनामी आणि २०२२ चा सियानजुर भूकंप यांसारख्या घटनांमधून या देशाने यापूर्वीही अनेकदा संघर्ष केला आहे. पण प्रत्येक वेळी ही आपत्ती त्या देशाच्या नागरिकांना खोलवर जखमा देऊन जाते. आता आलेला भूकंप आणि त्सुनामी देखील इतकी भयंकर आहे की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 250 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
निसर्गाचा प्रकोप! भूकंप आणि त्सुनामीचा हाहाकार! २० वर्षांतली सर्वात मोठी हानी, एका झटक्यात 250 नागरिकांचा मृत्यू
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement