न लाजता पादण्याचे फायदे! दिवसभर किती आणि कसं पादावं? डॉक्टरांनीच सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
पादणं किंवा फार्टिंग ही नैसर्गिक क्रिया तरी बरेच लोक ती करायला लाजतात. विशेषत: सर्वांसोबत असताना फार्ट आली की ती थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. पण याचे दुष्परिणाम होऊ शकतात. उलट फार्टिंग करण्याचे फायदे आहेत.
नवी दिल्ली : शिंकणं, खोकणं याप्रमाणेच फार्टिंग किंवा पादणं म्हणजेच गुदमार्गाने वायू सोडणं ही एक नैसर्गिक आणि शारीरिक क्रिया आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर माणसांसोबत असताना कोणतीही व्यक्ती फार्टिंग टाळते. अर्थात यामागे काही कारणं आहेत. चारचौघात अशी क्रिया लज्जास्पद मानली जाते. त्यामुळे फार्टिंग टाळलं जातं; पण पादण्याचे असे फायदे आहेत की तुम्ही विचारही केला नसेल.
अन्नपचनात पोटातल्या जिवाणूंचा मोठा सहभाग असतो. जिवाणू अन्नकणांवर होणाऱ्या प्रक्रियेमुळे सूक्ष्म स्वरूपात वायू तयार होतो. हा गॅस गुदद्वारातून नियमितपणे बाहेर सोडला जातो; मात्र असे गॅसेस रोखून धरणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. कारण पोट फुगल्यास हा गॅस तुमच्या रक्त प्रवाहात प्रवेश करू शकतो आणि याचे परिणाम घातक ठरू शकतात. तुम्ही जास्त काळ गॅसेस रोखून धरले तर ते तुमच्या रक्त प्रवाहात शोषले जाऊ शकतात आणि तुम्ही जेव्हा श्वास सोडाल तेव्हा ते त्यासोबत बाहेर पडू शकतात.
advertisement
एकदंर काय तर न पादण्याचे दुष्परिणाम आहेत, उलट लाज वाटली तरी पादण्याचे खूप फायदे आहेत. दिवसभरात किती वेळा पादावं, कसं पादावं हे डॉक्टरांनीच सांगितलं आहे.
कुणाला फार्ट जास्त येते?
एकाच वेळी जास्त पोट गच्च भरून खातात.
advertisement
घाईगडबडीने वेगाने जेवतात.
प्रत्येक घास चावून खात नाहीत.
जेवताना बोलतात, मोबाईल-टीव्ही बघतात.
जेवताना भरपूर पाणी पितात.
जास्तीची दारू पितात, सिगारेट ओढतात.
आहारात साखर, गोड पदार्थ जास्त असतात.
कार्बोनेटेड ड्रिंक, सोडायुक्त पेय पितात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक अँटिबायोटिक्स खातात.
स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी आणि मासिक पाळीच्या कालावधीत खाण्याचं प्रमाण जास्त वाढतं.
advertisement
दिवसभरात किती वेळा पादावं?
दिवसभरात 25 वेळा पादणं सामान्य असणं. पण पादण्यासोबत तुमच्या पोटात दुखत असेल, कळ येऊन शौचाला होत असेल तर मात्र डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पादण्याची योग्य पद्धत
जमिनीवर उताणी झोपा.
पाय गुडघ्यात दुमडा छातीकडे आणा.
दोन्ही गुडघ्यांना दोन्ही हातांनी घट्ट धरा.
हनुवटी गुडघ्याच्या जवळ आणा.
एक मिनिट या स्थितीत राहा.
advertisement
तुमचा गॅस निघून जाईल.
पादण्याचे फायदे
view commentsपोटातील गॅस सोडल्याने म्हणजे पादल्याने तुमची पचनशक्ती वाढते, तसंच शरीरातील वात कमी होतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉ. ऋषिकेश यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
Location :
Delhi
First Published :
May 04, 2024 4:24 PM IST


