इथे जॉबसाठी इंटरव्ह्यू घेण्याची विचित्र पद्धत! आधी पाजतात दारू, मग..कारण जाणून थक्क व्हाल

Last Updated:

ते नेहमीप्रमाणे मुलाखत घेत असत मात्र संध्याकाळी ते सर्वजण दारू पिण्यासाठी बाहेर पडायचे आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भरपूर दारू पाजण्याचा प्रयत्न करायचे.

इंटरव्ह्यू घेण्याची विचित्र पद्धत (प्रतिकात्मक फोटो)
इंटरव्ह्यू घेण्याची विचित्र पद्धत (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली : आपण कुठेही नोकरी शोधायला गेलो की कंपनीत आधी आपली मुलाखत घेतली जाते. त्यात बरेच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे इंटरव्ह्यू द्यायला जायचं म्हटलं की आधीपासूनच त्याची तयारी सुरू होते. फक्त प्रश्नांचीच नाही तर अगदी कपडे कोणते घालायचे, इथपासून आपण सगळी तयारी सुरू करतो. पण एवढी सगळी तयारी करूनही नोकरी मिळेलच असं नाही. कारण प्रत्येक कंपनीची मुलाखत घेण्याची पद्धत वेगळी असू शकते. आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीने त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने मुलाखतीसाठी वापरलेली वादग्रस्त पद्धत शेअर केली.
सेल्स इंजिनअर्सच्या टीममध्ये सामील होण्यासाठी लोकांच्या मुलाखती घेत असताना मोठे अधिकारी ही विचित्र पद्धत वापरतात. या वापरकर्त्याने Reddit वर सांगितलं की त्याने अलीकडेच एका कंपनीची मुलाखत दिली होती. ज्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्याला विक्री अभियंत्यांची मुलाखत घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं. ते नेहमीप्रमाणे मुलाखत घेत असत मात्र संध्याकाळी ते सर्वजण दारू पिण्यासाठी बाहेर पडायचे आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भरपूर दारू पाजण्याचा प्रयत्न करायचे.
advertisement
त्याने पुढे स्पष्ट केलं, की त्याचा उद्देश मनोरंजन हा आहे, असं सांगितलं जातं. मात्र , यासोबतच एखादी व्यक्ती आपल्या मर्यादा कशा सांभाळते आणि नम्रपणे नकार देऊ शकते का? किंवा समोर भरपूर दारू असतानाही दारू पिणे थांबवू शकते का याचीही चाचणी होती. कारण, मद्यपान हा विक्री व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे..
advertisement
ही पद्धत वापरकर्त्यासाठी खूपच आश्चर्यकारक होती. यावर त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका व्यक्तीने कमेंट केली की, हे जाणून घेण्यासाठी ही पद्धत चांगली आहे, की तुम्ही कितीही चांगला वेळ घालवत असला तरी तुमची मर्यादा कशी लक्षात ठेवता. एका युजरने असंही म्हटलं आहे, की दारू पिऊन कधी कधी सभ्य राहणं कठीण होतं. आणखी एका व्यक्तीने म्हटलं, की त्याच्यासाठी ही एक सोपी परीक्षा असेल. त्याला बिअरची चव आवडत नाही. तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं, की उद्योग आणि देश यावर अवलंबून, मद्य हा नक्कीच विक्रीचा मोठा भाग आहे.
मराठी बातम्या/Viral/
इथे जॉबसाठी इंटरव्ह्यू घेण्याची विचित्र पद्धत! आधी पाजतात दारू, मग..कारण जाणून थक्क व्हाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement