बायकोला बॉयफ्रेंडसोबत पकडलं, पोलिसांनी नवर्यालाच जेलमध्ये डांबलं; प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
हॉटेलच्या रूममध्ये एका व्यक्तीने पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं. पण नंतर असं काही घडलं की, पोलिसांनी पतीला पकडून पोलीस ठाण्यात नेलं आणि न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
बीजिंग : विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं कमी नाहीत. कधी पत्नीने आपल्या पतीला दुसर्या महिले सोबत पकडलं तर कधी पतीने पत्नीला पर पुरुषा सोबत. असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. पतीने पत्नीला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पकडलं. पण इथं शिक्षा बॉयफ्रेंडला नव्हे तर पतीलाच झाली.
चीनमधील हे अजब प्रकरण आहे. हॉटेलच्या रूममध्ये एका व्यक्तीने पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं. पण नंतर असं काही घडलं की, पोलिसांनी पतीला पकडून पोलीस ठाण्यात नेलं आणि न्यायालयाने त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.
असं काय झालं की प्रकरण पूर्णपणे उलटलं आणि पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याऐवजी त्या व्यक्तीला अटक करून पोलीस ठाण्यात नेलं. याचं कारण आश्चर्यकारक आहे.
advertisement
ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण पूर्व चीनच्या शेंडोंग प्रांतातील आहे. जिथे एका 33 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला खोलीत दुसऱ्या पुरुषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं आणि त्यालाच तुरुंगात जावं लागलं.
आपली पत्नी आपल्या मुलीला शिक्षिकेकडे सोडण्यासाठी जाते तेव्हा तिला परत यायला बराच वेळ लागतो हे लक्षात आल्यावर त्या व्यक्तीला आपल्या पत्नीवर संशय आला. यानंतर त्याने पत्नीचा पाठलाग करण्याचं ठरवलं. पत्नी हॉटेलमध्ये पोहोचून एका रूममध्ये गेल्याचं त्याने पाहिलं. काही वेळाने तोसुद्धा खोलीत गेला. तेव्हा त्याला त्याची पत्नी एका अनोळखी व्यक्तीसोबत बेडवर दिसली.
advertisement
त्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराला मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे या घटनेनंतर महिलेच्या प्रियकराने त्याच्यावर खंडणीचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने या व्यक्तीला ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने पैसे घेतल्याप्रकरणी दोषी ठरवलं आणि त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान, तो माणूस दावा करत राहिला की त्याची पत्नी आणि प्रियकर डेटिंग करत आहेत, परंतु न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला.
advertisement
पत्नीच्या प्रियकराला मारहाण करण्याची धमकी देऊन 25,000 युआन (म्हणजे अंदाजे 3 लाख रुपये) लुटल्याचा आरोप असल्यामुळे पतीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 19, 2024 9:48 AM IST


