'मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण...' IAS टीना डाबींकडे शेतकऱ्याची विचित्र मागणी, पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Last Updated:

टीना डाबी या बारमेरच्या जिल्हाधिकारी आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला एका सार्वजनिक सुनावणीदरम्यान एका गावकऱ्याने त्यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी हॅलिकॉप्टरची मागणी केली, ज्यामुळे आता हा शेतकरी आणि टीना डाबी पुन्हा चर्चेत आल्या.

टीना डाबींना शेतकऱ्याचं विचित्र पत्र
टीना डाबींना शेतकऱ्याचं विचित्र पत्र
मुंबई : आयएएस अधिकारी टीना डाबी यांना कोण ओळखत नाही? त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, शिवाय त्यांच्या सौंदर्यामुळे देखील त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचं खासगी आयुष्य, लग्न, इतिहास याबद्दल आता सर्वांनाच जवळजवळ सगळं माहित झालंय. अजूनही लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या संबंधीत कोणतीही बातमी आली तरी त्याबद्दल उत्सुक असतात.
अशीच एक बातमी राजस्थानमधून समोर आली आहे. इथे टीना डाबी या बारमेरच्या जिल्हाधिकारी आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला एका सार्वजनिक सुनावणीदरम्यान एका गावकऱ्याने त्यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी हॅलिकॉप्टरची मागणी केली, ज्यामुळे आता हा शेतकरी आणि टीना डाबी पुन्हा चर्चेत आल्या.
सोशल मीडियावर शेतकऱ्याच्या पत्राचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने हेलिकॉप्टरची मागणी का केली किंवा त्याला ते का हवंय? यामागचं कारण देखील लिहिलं आहे.  मंगळवारी सेडवा येथे डाबी लोकांच्या तक्रारी ऐकत असताना मांगीलाल यांनी ही विचित्र मागणी केली.
advertisement
शेतकऱ्याने सांगितल्या प्रमाणे अतिक्रमणामुळे त्याला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने प्रशासनाने आपल्याला हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, असा दावा शेतकऱ्याने केला. जोरापुरा येथील रहिवासी असलेल्या मांगीलाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. ते म्हणाले की, त्यांच्या शेतातही योग्य रस्ता नाही.
उपविभागीय दंडाधिकारी (SDM) आणि पोलिसांच्या मदतीने रस्ता बनवण्यात यश मिळाला होता असं शेतकरी म्हणाला मात्र, खेराजाराम नावाच्या शिक्षकाने रस्त्यावर अतिक्रमण करून जमिनीवर जिरे पेरले होते, असे मांगीलाल यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत किंवा शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ताच उरला नाही.
advertisement
शेतात जाण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने मला पीक काढता येत नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी, असा दावा मांगीलाल यांनी केला.
आपली व्यथा व्यक्त करताना, मांगीलाल यांनी बाडमेरच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाही टीना डाबी यांच्या नदर्शनात आणून दिला आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर ग्रामस्थांना त्रास देण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला. आता टीना डाबी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय पाऊल उचलतील? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
advertisement
2015 UPSC टॉपर असलेल्या डाबीची गेल्या वर्षी बाडमेरचे जिल्हाधिकारी म्हणून राजस्थानमध्ये बदली झाली होती. डाबी यांनी 2018 मध्ये आयएएस अधिकारी अथर आमिर खान यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं, ज्याने मीडियाचे लक्ष वेधून घेतले. पण नंतर, दोन वर्षांनी हे लग्न संपलं. ज्यानंतर टीना डाबी यांनी दुसरं लग्न केलं.
मराठी बातम्या/Viral/
'मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण...' IAS टीना डाबींकडे शेतकऱ्याची विचित्र मागणी, पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement