Kitchen Jugaad Video : बाप्पा येतोय! पण त्याआधी कुकरमध्ये नारळ ठेवायला विसरू नका, गणेशोत्सवात मोठा फायदा

Last Updated:

Kitchen Tips Marathi : तुम्ही बाप्पाच्या आगमनाची पूर्ण तयारी केली असेल. पण आणखी एक गोष्ट मात्र करायला विसरू नका. ते म्हणजे कुकरमध्ये नारळ ठेवायला विसरू नका. या किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

News18
News18
मुंबई : आला रे आला गणपती बाप्पा आला... 27 ऑगस्ट, गणेश चतुर्थी, सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. बर्‍याच ठिकाणी सार्वजनिक गणपतींचं आगमन झालं आहे. घरगुती गणपतीही गणेश चतुर्थीला येतील. तुम्ही बाप्पाच्या आगमनाची पूर्ण तयारी केली असेल. पण आणखी एक गोष्ट मात्र करायला विसरू नका. ते म्हणजे कुकरमध्ये नारळ ठेवायला विसरू नका. या किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गणपती बाप्पा बसण्याआधी कुकरमध्ये नारळ ठेवा असा सल्ला एका महिलेने दिला आहे. आता गणेशोत्सावत तर याचा मोठा फायदा आहे. आता कुकरमध्ये नारळ ठेवल्याने असं काय होतं?  हे या महिलेने स्वतः करून दाखवलं आहे. याचा जबरदस्त असा फायदा आहे. एकदा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय लगेच कराल.
advertisement
नारळ घ्या, त्याच्या शेंड्या काढून टाका. आता प्रेशर कुकर घेऊन त्यात नारळ ठेवा 2 ग्लास पाणी टाका. कुकरचं झाकण बंद करून गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्या. कुकर थंड झाला की त्याचं झाकण उघडा. आतील नारळ गरम असतील तर ते थंड होऊ द्या. आता नारळावर ठोकता येईल अशी जड वस्तू घ्या. नारळावर सर्व बाजूने ठोका. थोड्या वेळाने तुम्हाला नारळाच्या वरचं कवच निघताना दिसेल आणि तुम्हाला अख्खा नारळ मिळेल. त्यावर  थोडंफार काळा भाग राहिला असेल तो सुरीने खरवडून काढता येईल.
advertisement
आता या नारळाला मध्यभागी सुरीने चीर देऊन त्यातील पाणी काढून घ्या. मग तो मध्यभागी कापून त्याचे दोन तुकडे करा. सुरीने त्याचे पातळ काप कापून घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या. हा नारळ न खवता नारळाचा किस तयार झाला.
advertisement
गणपती बाप्पा म्हणजे मोदक आले आणि मोदक म्हणजे त्यात नारळाचा किस. नारळाचा किस करायचा म्हणजे नारळ किसायला खूप वेळ जातो. पण तुम्ही अशा पद्धतीने झटपट नारळाचा किस बनवू शकता. बाप्पा येण्याआधी तुमचे मोदक तयार होतील.
advertisement
यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक कराव्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
(सूचना : हा लेख व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18 मराठी याची हमी देत नाही. कृपया हे करताना आवश्यक ती काळजी किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. काही विपरित घडल्यास नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : बाप्पा येतोय! पण त्याआधी कुकरमध्ये नारळ ठेवायला विसरू नका, गणेशोत्सवात मोठा फायदा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement