हिच्या प्रेमात जो पडला तो कर्माने गेला, तरुणीने 8 बॉयफ्रेंड बनवले, सगळे उद्ध्वस्त झाले, कारण काय?

Last Updated:

दिसण्यावरून प्रेम केल्याने अनेक जण फसतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणीने आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बॉयफ्रेंडना लुटलं आहे.

प्रतीतात्मक फोटो
प्रतीतात्मक फोटो
नवी दिल्ली : प्रेम कधी कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. शक्यतो प्रेमाची सुरुवात पाहण्यापासूनच होते. म्हणजे एखादी मुलगी सुंदर दिसते किंवा एखादा मुलगा स्मार्ट दिसतो म्हणून नजर पडते आणि मग हळूहळू प्रेम फुलू लागतं. पण असं दिसण्यावरून प्रेम केल्याने अनेक जण फसतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणीने आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बॉयफ्रेंडना लुटलं आहे.
चीनमधील 24 वर्षांची मुलगी, यिन शु असं तिचं नाव. तिने तब्बल 8 बॉयफ्रेंड बनवले. गरीब कुटुंबातील असल्याने यिन शुने 5 वर्षांत 10 कोटी कमवून श्रीमंत होण्याची योजना आखली. यासाठी तिने तिच्या सौंदर्याचा वापर शस्त्र म्हणून केला.
सगळ्यात आधी तिने नोकरी सोडली आणि नंतर सुंदर दिसण्यासाठी तिची सर्व सेव्हिंग प्लॅस्टिक सर्जरीवर खर्च केली. यिन शुने फिटनेस रूटीन, चांगल्या ड्रेसिंग स्टाईल शिकल्या आणि सोशल मीडियावर श्रीमंत लोकांना लक्ष्य करायला सुरुवात केली.
advertisement
यिन तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी राहण्याच्या बहाण्याने डिझायनर बेल्ट, महागडे सोफे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरायची. नंतर ती सर्व वस्तू ऑनलाइन सेकंड-हँड प्लॅटफॉर्मवर विकत असे. तिने काही महिन्यांतच 8 श्रीमंत लोकांकडून 2 लाख युआन म्हणजे सुमारे 22 लाख रुपये चोरले.
advertisement
तिच्या नवव्या प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न करताना ती पकडली गेली यिन शुयेची चोरी तिच्या नवव्या प्रियकराच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रियकराच्या घरी दरोडा टाकताना यिन कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर प्रियकराने पोलिसांना फोन करून बोलावलं आणि यिनला अटक झाली. यिनने पोलिसांसमोर तिचा गुन्हा कबूल केला, त्यानंतर सत्य बाहेर आलं.
मराठी बातम्या/Viral/
हिच्या प्रेमात जो पडला तो कर्माने गेला, तरुणीने 8 बॉयफ्रेंड बनवले, सगळे उद्ध्वस्त झाले, कारण काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement