बायको असून जवळ येत नव्हता नवरा; सत्य जाणून घ्यायला दिराकडे पोहोचली महिला, बसला धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
कपलनं लव्ह मॅरेज केलं. त्यांना तीन मुलं झाली. पण लग्नाच्या 11 वर्षांनी पती अचानक पत्नीपासून दूर राहू लागला. यामागील सत्य समजताच पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली.
लखनऊ : पूजा सिंह ओम सिंह यांचं 10 वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालं. कुटुंबाला मान्य नसताना त्यांनी 25 जून 2013 रोजी लग्न केलं. त्यांना आता तीन मुलंही आहेत. पण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर ओम पूजापासून दूर दूर राहू लागला. पूजाला संशय आला. त्याबाबत चौकशी करण्यासाठी म्हणून ती दिराकडे गेली. तिथं तिला जे समजलं त्यानंतर धक्काच बसला.
उत्तर प्रदेशच्या बांदामधील हे प्रकरण आहे. प्रेमपूर गावातील पूजा नावाची ही महिला प्रेमविवाहाच्या 11 वर्षानंतर न्यायासाठी लढत आहे. सासरचे प्रेमविवाहाविरोधात असताना तिनं ओमसोबत लग्न केलं. ओमचं दुसरं लग्न लावणार असं सांगून त्याला सोडण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर काढलं. त्यानंतर ती तिचा नवरा आणि तीन मुलांसह अटारा शहरात भाड्याच्या खोलीत राहू लागले.
advertisement
काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा गावी गेला होता. गावावरून परत आल्यानंतर तो तिच्यासोबत कमी राहू लागला. नंतर एक महिनाभर तो तिच्याकडे आलाच नाही. तिनं सासरच्या मंडळीकडे चौकशी केली. सासरा आणि दीराकडे आपल्या नवऱ्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिच्या नवऱ्याने आपल्या घरच्यांच्या सांगण्यावरून 15 मे रोजी गुपचूप लग्न केल्याचं समजलं. हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.
advertisement
महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार
त्यानंतर महिलेने 28 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनीही तिला मदत करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर महिलेने सासर गाठून सासरच्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. पण सासरच्यांनी तिला घरात येऊ दिलं नाही. पुन्हा घरी आल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला घरातून हाकलून दिलं.
advertisement
कुटुंबीयांवर कारवाईची मागणी
त्यानंतर पीडित महिलेने आपल्या तीन निष्पाप मुलांसह आपलं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य वाचवण्यासाठी न्याय मिळेल या आशेने अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पोलीस ठाण्यात सुनावणी होत नसल्याने तिनं पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर कारवाईची मागणी केली. पीडित महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या पतीनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून त्याला घरात वाटा मिळावा जेणेकरून ती मुलांना छत देऊ शकेल. या प्रकरणी गिरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करून कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Jun 15, 2024 11:47 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बायको असून जवळ येत नव्हता नवरा; सत्य जाणून घ्यायला दिराकडे पोहोचली महिला, बसला धक्का








