advertisement

चालत्या ट्रेनमध्ये घेतला चहा, विचित्र वासाने प्रवासी हैराण; सत्य समजताच सर्वांनाच धक्का

Last Updated:

चहाबाबत रेल्वे प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. तपासणी पथकाच्या पथकाने विक्रेत्याला पकडले आणि सत्यता समजताच प्रवाशांना धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली :  लांबचा प्रवास म्हटलं की प्रवासात चहा आलाच. तुम्ही ट्रेनने प्रवास केला असाल तर ट्रेनमध्येही चहा विक्रेते येतात हे पाहिलं असेल. तुम्हीसुद्धा ट्रेनमधील हा चहा प्यायला असाल. अशाच एका ट्रेनमध्ये एक चहा विक्रेता आला. त्याने प्रवाशांना चहा दिला. पण या चहाचा वस इतका विचित्र की चहा पिणारेच नव्हे तर आजूबाजूचे प्रवासीसुद्धा हैराण झाले. शेवटी सत्य समजताच सर्वांनाच धक्का बसला.
आग्रा विभागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी एका चहा विक्रेत्याकडून चहा घेतला आणि तो तोंडाजवळ नेला तर उग्र वास येऊ लागला. आजूबाजूच्या प्रवाशांनाही हा वास येत होता. प्रवाशांनी याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेकिंग पथकाची टीम ट्रेन क्रमांक 22182 गोडवाना एक्स्प्रेसची तपासणी करत होते. यावेळी लोकांनी चहाला दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. तपासणी पथकाने विक्रेत्याला पकडलं. त्यानंतर यामागील धक्कादायक सत्य समजलं.
advertisement
चहाच्या विचित्र वासाचं कारण काय?
ट्रेनमध्ये एक बेकायदेशीर साईड पॅन्ट्रीकार चालत होती. तीन जण गाड्यांमध्ये अवैध विक्री करताना आढळून आले. प्रवासी चहा प्यायचे तोपर्यंत ते पुढे जायचे आणि ट्रेन थांबली की लगेच खाली उतरायचे. त्यांना लगेच पकडण्यात आलं.
चौकशीत विक्रेत्यांनी सांगितलं की चहा कमी असताना ते घाण भरायचे, ज्यामुळे कधीकधी दुर्गंधी निर्माण होते.  अवैध विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यात चहा-कॉफीची किटली, 60 पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटं आणि इतर वस्तू सापडल्या.
advertisement
धावत्या गाड्यांमध्ये बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची विक्री करताना विक्रेते पकडले गेले आहेत. हे विक्रेते रेल्वे प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांना लक्ष्य करतात, त्यांना चेकिंग पथकाने रेल्वे सुरक्षा बल आग्रा कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात दिलं. प्रवाशांनी अधिकृत विक्रेते आणि फेरीवाल्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ते योग्य गणवेशात येतात आणि त्यांची बॅच असते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
चालत्या ट्रेनमध्ये घेतला चहा, विचित्र वासाने प्रवासी हैराण; सत्य समजताच सर्वांनाच धक्का
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement