जंगलात व्हिडीओ बनवताना दिसले नरभक्षक आदिवासी, त्यांना खायला मीठ; त्यानंतर घडलं असं, अंगावर काटा येईल

Last Updated:

Man meet Cannibal Tribe : एका ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरने नरभक्षक जमातीच्या जवळ जाऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली.

News18
News18
नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये जिथं आदिवासी अजूनही राहतात, अशा ठिकाणी जाण्यास सरकारने मनाई केली आहे. जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक जीवनात शहरी हस्तक्षेप होऊ नये आणि ते त्यांच्या श्रद्धा आणि रितिरिवाजांचे पालन करू शकतील. असंच एका आदिवासी राहत असलेल्या ठिकाणी काही लोक गेलं. बरं ही आदिवासी जमात साधीसुधी नाही तर नरभक्षक. तिथं जाऊन या व्यक्तीने चक्क त्यांना मीठ दिलं. त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे.
दारा ताह नावाचा आयरीश ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो इंडोनेशियातील पापुआ इथला आहे. इथं राहणाऱ्या कथित नरभक्षक जमातीशी त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली.
advertisement
व्हिडिओमध्ये ताह काही पर्यटक आणि स्थानिक मार्गदर्शक डेमीसह लाकडी होडीतून नदीवर प्रवास करताना दिसत आहे. काठावर उभे असलेले स्थानिक लोक ओरडतात आणि त्यांच्याकडे इशारा करतात. मग जमातीतील एक व्यक्ती धनुष्यबाण घेते आणि बोटीकडे इशारा करते. एक घाबरलेला पर्यटक म्हणतो- "असं दिसतं की हे लोक त्यांचं धनुष्यबाण आपल्यावर लक्ष्य करत आहेत." ताह म्हणतो, "हे खरोखरच भयानक आहे. त्यांचे धनुष्य खूप मोठे आहेत." परिस्थिती हाताळण्यासाठी ताह जमातीच्या प्रमुखाला मीठ देण्याचा प्रयत्न करतो. तो पॅकेटमधून मीठ काढतो, त्याच्या हातात ठेवतो. परंतु पानांपासून बनवलेला झगा घातलेला आणि धनुष्यबाण घेऊन उभा असलेला तो लीडर मीठ चाखल्यानंतर लगेचच ते थुंकतो आणि आणखी आक्रमक होतो.
advertisement
ताह म्हणतो, "असं दिसतं की त्याला ते आवडलं नाही. ठीक आहे मित्रांनो, आपण मागे हटलं पाहिजे." गाईड डेमी इशारा देतो, "आपल्याला इथून निघून जावं लागेल. हे खरोखर धोकादायक आहे. आमचं स्वागत नाही." बोट मागे हटताच, ताह कॅमेऱ्याला म्हणतो, "खरं सांगायचं तर, हा खूप भयानक अनुभव होता." व्हिडिओच्या शेवटी गाईड डेमी माफी मागतो, "मला माफ करा मी तुम्हाला इथं आणलं." धोकादायक वातावरण आणि स्पष्ट धोका असूनही, ताहने हार मानली नाही. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "उद्या पुन्हा प्रयत्न करेन. शुभेच्छा."
advertisement
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी ताहवर राग काढला. युझर्सचं म्हणणं आहे की त्याने स्थानिक जमातीचा वापर फक्त त्याच्या कंटेंट आणि दृश्यांसाठी केला. पर्यटकांच्या सुरक्षिततेशी आणि जमातीच्या प्रतिष्ठेशी खेळल्याबद्दल अनेकांनी गाईड डेमीवर टीका केली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जंगलात व्हिडीओ बनवताना दिसले नरभक्षक आदिवासी, त्यांना खायला मीठ; त्यानंतर घडलं असं, अंगावर काटा येईल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement