VIDEO: 11 वर्षीय पोराच्या हातात विमान देऊन बाप बसला बिअर पीत; शेवटी नको तेच घडलं..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
airplane crashed: वैमानिकाला विमान चालवताना काटेकोर नियम पाळून सतर्क राहावे लागते. व्यावसायिक विमान असो की खासगी, हे नियम मोडल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. विमानात बिअर पीत असताना एका बापाने...
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : साधारणपणे कोणत्याही वैमानिकाला विमान चालवताना काटेकोर नियम पाळून सतर्क राहावे लागते. व्यावसायिक विमान असो की खासगी, हे नियम मोडल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. विमानात बिअर पीत असताना एका बापाने आपल्या 11 वर्षाच्या मुलाकडे विमानाची कमान सोपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंतर या विमानाचा अपघात झाला आणि अपघातात पिता-पुत्र दोघांचाही मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूचा जबर धक्का सहन न झाल्यानं मुलाच्या आईनेही आत्महत्या केली. घटनेपूर्वीचा विमानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलगा विमान चालवण्यासाठी बसल्याचे दिसत आहे आणि वडील बिअर पिताना दिसत आहेत.
42 वर्षीय गारोन माईया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को माईया अशी मृतांची नावे आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही मृतदेहांवर अंतिम संस्कार केल्यानंतर पायलटची पत्नी अॅना प्रिडोनिक हिनेही आत्महत्या केली. विमान अपघाताची घटना 29 जुलै रोजी उघडकीस आली. ट्विन-इंजिन असलेले खासगी विमान ब्राझील देशातील रॉन्डोनिया आणि माटो ग्रोसो राज्यांमधील जंगली भागात कोसळले. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी पत्नीने आत्महत्या केली.
advertisement
Avião bimotor Beechcraft Baron 58, de matrícula PR-IDE, "caiu matando pai e filho" a Aeronave cair em uma região de mata fechada, na divisa de Rondônia e Mato Grosso. Os destroços da aeronave foram localizados na manhã deste domingo (30) o pecuarista Garon Maia e o filho. pic.twitter.com/nOEBpVZJup
— D' AVIATION (@pgomes7973) August 1, 2023
advertisement
हे विमान ट्विन-इंजिन असलेले बीचक्राफ्ट बॅरन-58 होते, ज्याची किंमत $1.2 दशलक्ष म्हणजेच सुमारे 9.9 कोटी रुपये होती. गारोनने बनवलेल्या व्हिडिओमध्ये तो बिअर पिताना दिसत आहे. तो आपल्या मुलाला विमानाचे उड्डाण आणि नियंत्रण याबाबत सूचना देताना दिसत आहेत. या दरम्यान त्याचा आवाज ही रेकॉर्ड झाला आहे, गोरान म्हणतो की, 'थांब, सर्वकाही तयार आहे ना? समोर काही नाही, ठीक आहे. कमऑन, 600 घोडे तू 600 किकोंना ओढू शकतो, चल' तो पुढे म्हणाला, 'गुड बेबी. लीव्हरवर हात, लीव्हरवर हात. तिथे हात लाव आणि वेगावर लक्ष ठेव.' आणि थोड्याच वेळात त्याने बिअर उघडली आणि विचारले, 'प्रवाशी एक घेऊ शकतो, होय ना किको?'
advertisement
डेली मेलच्या वृत्तानुसार, नोव्हा कॉन्क्विस्टा येथील रॉन्डोनिया शहरातील एका शेतातून गॅरॉनने या विमानाचे उड्डाण केले. विमानात इंधन भरण्यासाठी विल्हेना विमानतळावर ते थांबले. त्याच्या मुलाला कॅम्पो ग्रांडे, माटो ग्रोसो डो सुल येथे परत पाठवण्यासाठी तो निघाला होता, तिथे तो त्याच्या आईसोबत राहायचा आणि शाळेत जात असे.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
August 09, 2023 2:04 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO: 11 वर्षीय पोराच्या हातात विमान देऊन बाप बसला बिअर पीत; शेवटी नको तेच घडलं..


