बापरे! हे काय? सकाळी उठताच पँटवर दिसला हिरवा डाग, भीतीने सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो, समजलं ते शॉकिंग

Last Updated:

Green Stain On Pant : मुलाने त्याच्या पँटवरील हिरव्या डागाचे कारण जाणून घेण्यासाठी रेडिटवर फोटो पोस्ट केला. बहुतेक युझर्सनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

News18
News18
नवी दिल्ली : बऱ्याचदा आपल्यासोबत असं काही घडतं जे विचित्र असतं, त्याचं उत्तर किंवा कारण आपल्याला माहित नसते. इंटरनेटवर प्रत्येक गोष्टीचे उत्तर असल्याने लोक इंटरनेटवर त्या घटनांचा उल्लेख करतात आणि त्याचं उत्तर किंवा कारण विचारतात. असाच एक तरुण ज्याच्यासोबत एक अजब घटना घडली. त्याला त्याचं कारण समजेना. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आणि त्याबाबत विचारलं. त्यावेळी त्याला जे सत्य समजलं ते श़ॉकिंग आहे.
एका मुलाने रेडिट या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर r/Weird वर एक ग्रुप आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी @Gazers22 या युझरने या ग्रुपवर एक फोटो पोस्ट केला आणि लोकांकडून मदत मागितली.
पँटवर अचानक दिसला हिरवा डाग
या फोटोत त्याने आपला पाय टाकला आहे. त्याने पँट घातली आहे आणि त्या पँटवर हिरव्या रंगाचा डाग दिसत आहे. गोलाकार आकारात हा डाग आहे. रात्री झोपताना त्याच्या पँटवर डाग नव्हता. पण सकाळी उठल्यानंतर अचानक त्याला त्याच्या पँटवर हा हिरवा डाग दिसला. त्यामुळे तो घाबरला. हे नेमकं काय ते त्यालाही समजेना म्हणून त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत मदत मागितली आहे.
advertisement
मुलाने पोस्टमध्ये सांगितलं की, जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याला त्याच्या पँटवर हिरव्या रंगाचा हा विचित्र डाग दिसला. असं त्याच्या शरीरावर इतर कुठेही नव्हते, ते फक्त तिथंच होतं.
जर हा डाग लाल असता, तर ते रक्त असावं असं समजलं असतं, निळा किंवा काळा असता तर शाईचा डाग असावा, असा अंदाज बांधता आला असता. पण असा हिरवा डाग खूप विचित्र आहे. या कारणास्तव, त्या व्यक्तीने रेडिटवर फोटो पोस्ट केला आणि लोकांकडून सल्ला मागितला.
advertisement
हा हिरवा डाग कसला?
हजारो युझर्सनी या मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. हा हिरवा डाग कसला हे सांगितलं आहे. काहींनी तर अगदी भीतीदायक कारण दिलं आहे. एका युझरने विचारलं की तुमच्या बेडवर चार्जिंग केबल आहे का?  एका युझरने म्हटलं की त्याला त्याच्या उशीवरही असाच हिरवा डाग दिसला. त्यानंतर माझा आयफोन केबल कापला गेला होता आणि त्यातून हिरवा पदार्थ गळल्याचं सांगितलं. एकाने विचारलं की त्याने कोणत्या हिरव्या रंगाचा खाद्यपदार्थ खाल्ला होता का? एकाने विचारलं, तुझ्याकडे हिरव्या शाईचा पेन आहे का? तर एकाने चक्क कुणी त्याला कार्बन मोनोक्साइडचं विष दिलं का असंही विचारलं. एकाने तर याचा संबंध थेट एलियन्सशी जोडला आहे.
advertisement
तुम्हाला काय वाटतं हा हिरवा डाग कसला असेल? तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या/Viral/
बापरे! हे काय? सकाळी उठताच पँटवर दिसला हिरवा डाग, भीतीने सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो, समजलं ते शॉकिंग
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement