जय श्रीराम! राम जन्मभूमीत अवतरले साक्षात 'हनुमान'; पुढे घडलं असं की... पाहा PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील शाळा, मठ, मंदिरे आणि लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.
अयोध्या : 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात होता, सर्वत्र देशभक्तीच्या घोषणा दिल्या जात होता. अयोध्येतही मठ आणि मंदिरांमध्ये तिरंगा फडकवण्यात आला. मात्र याच दरम्यान अयोध्येत एक अजब प्रकार घडला. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ही घटना अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस स्टेशनमध्ये घडली. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील शाळा, मठ, मंदिरे आणि लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. त्याचवेळी अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं.
पोलीस ठाण्यात माकड
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक माकड आलं आणि एसएचओ देवेंद्र कुमार यांच्या खुर्चीवर बसलं. एसएचओ देवेंद्र पांडे यांनी सांगितलं की, ध्वजारोहणानंतर जेव्हा ते आपल्या खुर्चीवर परतले, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या खुर्चीवर एक माकड आधीच बसलं आहे.
advertisement
पोलिसाने माकडाला केला सलाम 

धार्मिक मान्यतेनुसार वानरांना वानरपुत्र हनुमानाच रूप मानलं जातं आणि अयोध्येत त्यांची पूजा केली जाते. स्वतःला हनुमानाचा भक्त म्हणवणाऱ्या देवेंद्र पांडे यांनी माकडाला वाकून नमस्कार केला. देवेंद्र पांडे यांनी या माकडाला सलाम केला, जो आता केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे.
advertisement
पवनपुत्र हनुमानाचे आशीर्वाद
स्वातंत्र्यदिनानिमित्त पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि हीच त्यांच्यासाठी देवाची माया आहे, अशी त्यांची धारणा आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
August 16, 2024 8:56 AM IST
मराठी बातम्या/Viral/
जय श्रीराम! राम जन्मभूमीत अवतरले साक्षात 'हनुमान'; पुढे घडलं असं की... पाहा PHOTO