General Knowledge : भारतातील शाकाहारी राज्य कोणतं? जिथं लोक अंड्यालाही हात लावत नाहीत, क्वचितच कोणाला माहित असेल उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भारतात शाकाहार केवळ खाण्याची पद्धत नाही, तर अनेकांसाठी ती एक जीवनशैली आहे. काहीजण तर अंड्यालाही नॉनवेज मानतात.
मुंबई : अमेरिकेपासून ते कोरियापर्यंत तुम्ही जगात कुठेही जा सगळीकडे मांस, मासे आणि अंडी खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मांसाहार हा अनेक देशांमध्ये रोजच्या आहाराचा भाग आहे. पण जेव्हा "शुद्ध शाकाहार" या शब्दाचा उल्लेख होतो, तेव्हा सर्वप्रथम भारताचंच नाव डोळ्यासमोर येतं.
भारतात शाकाहार केवळ खाण्याची पद्धत नाही, तर अनेकांसाठी ती एक जीवनशैली आहे. काहीजण तर अंड्यालाही नॉनवेज मानतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात असं एक राज्य आहे जिथं तब्बल 75 टक्क्यांहून अधिक लोक केवळ शाकाहारी आहेत? चला तर पाहूया, कोणतं आहे हे 'शुद्ध शाकाहारी' राज्य...
राजस्थान – शाकाहारात अव्वल
नेशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या आकडेवारीनुसार, राजस्थान हे भारतातलं सर्वात शाकाहारी राज्य आहे. इथं तब्बल 74.9% लोक शुद्ध शाकाहारी आहेत. याचा अर्थ असा की, इथले बहुतांश लोक ना मांस खातात, ना मासे, आणि ना अंडी.
advertisement
राजस्थानी आहारात मुख्यतः डाळ, बाजरीची भाकरी, तूप, दूध, लोणी, भात, आणि भाज्या यांचा समावेश असतो. धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळेही इथल्या अनेक घरांमध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे.
नागालँड – 99% लोक मांसाहारी
दुसरीकडे, यासगळ्याच्या विपरीत भारतातलं एक राज्य असंही आहे जिथं शाकाहारी लोकांची संख्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. म्हणजेज इथले जवळ-जवळ सगळेच लोक मांसाहार करतात आणि ते म्हणजे नागालँड.
advertisement
इथं जवळपास 99% लोक मांसाहारी आहेत. मासे, कोंबडी, डुकराचं मांस, आणि इतर नॉनव्हेज पदार्थ हे इथल्या रोजच्या आहाराचा भाग आहेत. नागालँडमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ हे मांसाहारीच असतात.
भारत ही विविधता असलेली भूमी आहे. इथं एकीकडे शुद्ध शाकाहारी संस्कृती असलेले राज्य आहे, तर दुसरीकडे पारंपरिक मांसाहारी आहार असलेलं राज्यदेखील. त्यामुळे भारतातील आहार संस्कृती ही केवळ चव नव्हे, तर विचार, परंपरा आणि जीवनशैलीचं दर्शन घडवतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : भारतातील शाकाहारी राज्य कोणतं? जिथं लोक अंड्यालाही हात लावत नाहीत, क्वचितच कोणाला माहित असेल उत्तर