फ्रिज विक्रीची पोस्ट, पण फोटोत फ्रिज आहे कुठे? सगळे शोधून थकले, तुम्हाला दिसला का?

Last Updated:

Optical Illusion photo viral : 'फ्रिज फॉर सेल' असं लिहिण्यात आलेला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा फोटो पाहिला पण या फोटोत फ्रिज कुठेच दिसेना.

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया
नवी दिल्ली : आजकाल ऑनलाईन खरेदी-विक्रीचा जमाना आहे. फक्त ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच नव्हे तर कित्येक लोक आपल्या सोशल मीडियावरही खरेदी विक्री करतात. म्हणजे एखादी वस्तू विकायची असली की आपल्या सोशल मीडिया पोस्टवर त्या वस्तूचा फोटो पोस्ट करून विकायची असल्याची जाहिरात दिली जाते. अशीच एक जाहिरात सध्या तुफान व्हायरल होते आहे.
एका फ्रिजची ही जाहिरात. एका घरातील फ्रिज विकायचा होता म्हणून सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे आणि 'फ्रिज फॉर सेल' असं लिहिण्यात आलं. अनेकांनी ही जाहिरात पाहिली पण या जाहिरातीच्या फोटोत फ्रिज कुठेच दिसेना.
advertisement
तुम्हीसुद्धा फोटो  नीट पाहा. एक किचन दिसतं आहे. पण किचनमध्ये फ्रिज मात्र कुठेच दिसत नाही आहे. फ्रिज विकायचा आहे पण तो आहे कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कितीतरी लोक फ्रिज शोधत आहेत. तुम्हीसुद्धा हा फोटो पाहाल तर गोंधळून जाल. यात फ्रिज नाहीच असं म्हणाल. पण जरा नीट पाहा. फ्रिज अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. दिसला का?
advertisement
तुम्ही जे किचन पाहात आहात तोच संपूर्ण फ्रिज आहे. आता हे कसं? तर फोटो नीट पाहा. तुम्हाला दिसत असलेलं किचन तिथं नाहीच म्हणजे ते विरुद्ध दिशेला आहे जी बाजू तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही जे किचन पाहात आहात ते तुम्हाला फ्रिजमध्ये दिसत असलेलं किचनचं प्रतिबिंब आहे. म्हणजे हा फ्रिज अगदी आरशासारखा आहे. ज्यात किचन दिसत आहे. जेव्हा तुमचं लक्ष संपूर्ण किचनकडे न जाता किचनला विभागणाऱ्या मधल्या रेषेकडे जातं तेव्हा तुम्हाला फ्रिज दिसतो. कारण ही रेषा म्हणजे फ्रिजर आणि फ्रिज या भागाला वेगळी करणारी आहे.
advertisement
आता तरी तुम्हाला किचन दिसलं का? @Vany_aagrahari युट्युब चॅनेलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत की फ्रिज शोधण्यातच वेळ गेला. तुम्हाला फ्रिज शोधण्यात किती वेळ लागला? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
फ्रिज विक्रीची पोस्ट, पण फोटोत फ्रिज आहे कुठे? सगळे शोधून थकले, तुम्हाला दिसला का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement