Kitchen Tips: इस्त्रीवर मीठ चोळा आणि झटक्यात होईल हे काम, पाह काय आहेत फायदे?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
किचन मधील अनेक सामानांचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यातील इतर गोष्टींमध्येही होतो. किचनमधील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्या वापरानं तुम्ही इतर काम चुटकीसरशी करु शकता. अनेक ट्रीक, हॅक वापरुन तुम्ही तुमचीही किचकट कामे सोपी करु शकता.
नवी दिल्ली : किचन मधील अनेक सामानांचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यातील इतर गोष्टींमध्येही होतो. किचनमधील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्या वापरानं तुम्ही इतर काम चुटकीसरशी करु शकता. अनेक ट्रीक, हॅक वापरुन तुम्ही तुमचीही किचकट कामे सोपी करु शकता. अशीच एक कामाची गोष्ट म्हणजे मीठ. जेवनाव्यतिरिक्त मीठ अनेक गोष्टींमध्ये कामी येतं. मीठाचा इतर गोष्टांमध्ये काय फायदा आहे तुम्हाला माहितीय का?
इस्त्रीवर मीठ चोळल्यावर काय फायदा आहे याविषयी जाणून घेऊया. यामुळे इस्त्रीला असणारे डाग कपड्यांना लागत नाही. आणि जळालेलं काळ्यामुळे कपडे खराब होत नाही. मात्र यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. पहिल्यांदा इस्त्री खूप गरम करु नये फक्त कोमट किंवा कोल्ड ठेवा. फक्त थोडं मीठ घेऊन त्यात मीठ शिंपडायचं. त्यानंतर काही कागदाच्या मदतीनं ते इस्त्रीवर घासायचं. असं केल्यानं तुमच्या इस्त्रीवरील डाग, बर्न मार्क्स आणि कडक पाण्याचे डाग निघून जातील. यानंतर, प्रेस थंड करुन स्वच्छ कापडानं ते स्वच्छ करा.
advertisement
कपड्यांवर रक्ताचे किंवा लघवीचे डाग पडले असतील तर ते कोमट पाण्यात मीठ टाकून भिजवू शकता. त्यात थोडासा साबण घाला आणि किमान अर्धा तास भिजवू द्या. लघवी आणि रक्ताचे डाग हलके निघून जातील.
मिठाच्या सहाय्यानं कृत्रिम फुले साफ करु शकता. स्वयंपाकघरातील स्पंज खूप घाणेरडा झाला असेल तर ते मिठाच्या मदतीने स्वच्छ करा. तुम्हाला फक्त गरम पाण्यात मीठ घालून त्यात स्पंज टाकायचा आहे. यानंतर काही वेळ तसंच राहू द्या आणि मग वाटी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. मायक्रोवेव्हमध्ये फक्त 1-2 मिनिटे ठेवा. यानंतर तुमचा स्पंज नव्यासारखा होईल आणि सर्व घाण निघून जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2024 8:07 PM IST










