Shocking! सर्दी-खोकल्याचं औषध घेताच प्रेग्नंट होत आहेत महिला; हे कसं शक्य आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात महिलांनी त्यांच्या गरोदरपणाचं कारण सर्दी-खोकल्याचं औषध सांगितलं आहे. सर्दी-खोकल्याच्या औषधामुळे गर्भधारणा झाल्याचा दावा महिलांनी केला आहे.
नवी दिल्ली : असे काही कपल आहेत, ज्यांना मूल होत नाही, मूल होण्यात काही ना काही समस्या उद्भवते. मग मूल व्हावं यासाठी वेगवेगळे उपचार घेतले जातात. काही लोकांना तर उपचार घेऊनही फायदा होत नाही. अशाच साध्या सर्दी-खोकल्याच्या औषधाने महिला प्रेग्नंट होत आहेत, असं सांगितलं तर...
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात महिलांनी त्यांच्या गरोदरपणाचं कारण सर्दी-खोकल्याचं औषध सांगितलं आहे. सर्दी-खोकल्याच्या औषधामुळे गर्भधारणा झाल्याचा दावा महिलांनी केला आहे. हे औषध आहे म्युसिनेक्स. यात गुआइफेनेसिन हा घटक असतो. जो कफ पातळ करून श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतो. सर्दीमुळे नाक बंद झालं तर त्यातपासून लगेच आराम मिळतो.
advertisement
पण हे औषध वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या महिलांसाठीही फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे. गर्भधारणेच्या प्रक्रियेत शुक्राणू प्रथम स्त्रीच्या योनीमध्ये जमा केले जातात. अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी शुक्राणूंना गर्भाशय ग्रीवामधून जावं लागतं. इथं श्लेष्मा तयार होतो, ज्याचं प्रमाण आणि सातत्य स्त्रीच्या मासिक पाळीत बदलते. ओव्हुलेशनच्या वेळी हे श्लेष्मा शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. जर श्लेष्मा खूप जास्त किंवा खूप जाड असेल तर ते शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास अडथळा आणू शकतात. अशा परिस्थितीत म्युसिनेक्स औषध उपयुक्त ठरतं, असं सांगितलं जात आहे.
advertisement
दाव्यात किती तथ्य?
म्युसिनेक्स प्रजननक्षमतेत मदत करू शकतं असे वैज्ञानिक पुरावे फार कमी आहेत. 1982 मध्ये जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार , शास्त्रज्ञांनी 40 जोडप्यांचा अभ्यास केला ज्यांच्या वंध्यत्वाची व्याख्या सर्विकल समस्या म्हणून केली गेली होती. अभ्यासात सहभागी महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून 200 मिलीग्राम गुआइफेनेसिन दिवसातून तीन वेळा देण्यात आलं. अभ्यासाच्या शेवटी 40 जोडप्यांपैकी 15 कपल प्रेग्नंट झाले.
advertisement
शुक्राणूंच्या उत्पादनावरही परिणाम
दुसऱ्या अभ्यासानुसार , एका व्यक्तीने दोन महिन्यांसाठी दिवसातून दोनदा 600 मिलीग्राम गुआइफेनेसिन घेतलं. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंची निर्मिती आणि गतिशीलता वाढलेली दिसून आली. हा अभ्यास एका 32 वर्षांच्या पुरुषावर आयोजित केल्यामुळे, संशोधक हे पुष्टी करू शकलं नाहीत की गुआइफेनेसिन बदलाचं कारण आहे.
advertisement
एकंदर प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी गुआइफेनेसिन परिणामकारक आहे, याचं समर्थन देण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे ज्यांना गरोदर राहण्यात अडचणी येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य.
Location :
Delhi
First Published :
October 22, 2024 11:21 AM IST