मोदी सरकारकडून PM Kisan चा हप्ता जमा, पैसे मिळाले की नाही? कुठे चेक कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana 21 Installment : महाराष्ट्रातील तब्बल 90.41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आज, 19 नोव्हेंबर 2025 रोजी जमा झाला आहे. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते.
मुंबई : महाराष्ट्रातील तब्बल 90.41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आज (19 नोव्हेंबर 2025) जमा झाला आहे. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते. दर तीन महिन्यांनी मिळणाऱ्या 2,000 रुपयांच्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीखर्चाला हातभार लागतो. यंदाचा हप्ता देखील केंद्र सरकारने थेट DBT प्रणालीद्वारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे.
पीएम मोदींनी हफ्ता केला वितरित
तमिळनाडूतील कोईंबतूर येथे आयोजित महत्त्वाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ऑनलाइन प्रणालीद्वारे या हप्त्याचे वितरण केले. तसेच महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुणे कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातील कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते या प्रसंगी सहभागी झाले होते.
advertisement
शेतकऱ्यांच्या खात्यात 1,808 कोटी रुपये जमा
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत आतापर्यंतच्या 20 हप्त्यांमधून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांत एकूण 37,502 कोटी रुपये जमा झाले आहेत. आता एकविसाव्या हप्त्याद्वारे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1,808 कोटी रुपये जमा झाले
पैसे कुणाला मिळणार नाही?
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत अनेक शेतकऱ्यांचा हप्ता e-KYC न केल्यामुळे रोखला गेला आहे. PM-Kisan योजनेत e-KYC अनिवार्य असल्याने ज्यांनी हे प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना हप्ता मिळणार नाही. तसेच पती-पत्नी दोघांच्या नावाने अर्ज झाल्यास कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच हप्ता मंजूर केला जातो. जमीन नोंदीत चुकीचे तपशील असल्यास, 7/12 उतारा अपडेट नसल्यास किंवा मालकी सिद्ध न झाल्यास देखील हप्ता थांबतो. नगरपालिकेत कर भरणारे व्यावसायिक, निवृत्त सरकारी अधिकारी, आयकर भरते शेतकरी आणि बनावट जमीन नोंदी करणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
advertisement
हप्ता कुठे चेक कराल?
सरकारने शेतकऱ्यांना हप्ता मिळाला की नाही हे स्वतः ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करून आपला मोबाइल नंबर, आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून हप्त्याची माहिती पाहू शकतात. यात हप्ता कोणत्या तारखेला जमा झाला? आधी किती हप्ते मिळाले? कोणत्या कारणामुळे हप्ता अडला आहे? यासंबंधी सर्व माहिती मिळते.
advertisement
दरम्यान, राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा झालेला हा हप्ता आगामी रब्बी हंगामाच्या तयारीसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी मदतीचा हात ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 4:29 PM IST


