Ajit Pawar : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? रोखठोक अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला

Last Updated:

Ajit Pawar On Farmer Loan : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल थेट आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

News18
News18
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. महायुतीच्या निवडणूक आश्वासनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल थेट आणि स्पष्ट वक्तव्य केले आहे. बारामतीमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या. आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली. आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे. शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे. त्या शिकवणी मधून आपण पुढे जात आहोत असे अजित पवार यांनी म्हटले.
advertisement

कर्जमाफीवर अजितदादांनी काय म्हटले?

अजित पवार यांन म्हटले की, काहींनी निवडणूक आधी कर्जमाफीचे बोलले होते. मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही. आता कर्जमाफी देण्यासारखी तशी परिस्थिती नाही. भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नसल्याचे अजित पवारांनी म्हटले.
advertisement

मोदी-शाहांकडे माझी ओळख...

अजित पवार यांनी आगामी माळेगाव साखर निवडणुकीच्या अनुषंगाने भाष्य केले. अजित पवारांनी म्हटले की, माझी मोदी आणि शहा यांच्याशी ओळख आहे हे तुमचा आतापर्यंत लक्षात आलं असेलच. केंद्रात काम असेल आपल्याकडून होणार, राज्यात काम असेल आपल्याकडून होणार. सहकार खात्यात काही काम असेल तरी आपल्याकडून होणार. परंतु इतरांचं तसं नाही. कारखान्याच्या इन्कम टॅक्स फक्त अमित भाईंमुळे निघाला. भावनिक होऊ नका. हे आधीच्या काळात का नाही झालं? असा प्रश्न करत त्यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Ajit Pawar : शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? रोखठोक अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement