नोकरी सोडून धरली गावची वाट, गावी येऊन केले खेकडा पालन, वर्षांला आता 6 लाखांचा नफा

Last Updated:

खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. यावरच आधारित एक उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी दीपक तेली यांनी केला आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे. 

+
News18

News18

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी आणि अथांग निळाशार अरबी समुद्राची किनार लाभली आहे. या किनारपट्टीला भूप्रदेशाशी 70 खाड्या जोडतात. काही ठिकाणी प्रदूषणाचा अपवाद वगळता हे क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील विविध प्रकारच्या मत्स्य संवर्धनासाठी उपयोगात आणले जाते. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धनाचे प्रकल्प कार्यान्वीत आहेत. यामधील खेकडा हा प्रामुख्याने मोठे अर्थार्जन मिळवून देणारा घटक आहे. यावरच आधारित एक उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वळिवंडे गावातील शेतकरी दीपक तेली या शेतकऱ्यांन केला आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
दीपक शिवाजी तेली हे सुरुवातीस मुंबई येथे कुटुंबा समवेत राहत होते. एका खाजगी कंपनी ते कामाला होते. मुबंईतील धावपळीच्या जीवनापासून लांब जाऊन गावात काही तरी व्यवसाय करावा अशी त्यांच्या मनात संकल्पना आली. त्यानुसार त्यांनी पाच वर्षापूर्वी मुंबई सोडून आपल्या मूळ गावी आले आणि स्वतःची घरा शेजारीच जागा असल्याने खेकडा पालन करावे अशी संकल्पना मनात आणली.
advertisement
त्यासाठी सुरुवातीस त्यांनी एक टॅंक रेडिमेट ऑर्डर केली. त्यात गावातीलच नदीतील खेकडे आणून सोडले. त्या टॅंकमध्ये त्यांना 1 वर्षा नंतर 400-450 किलो खेकड्याच उत्पन्न मिळाले. 350 ते 400 रुपयाने त्यांनी ते खेकडे स्थानिक बाजारातील हॉटेल वाल्याना विकले. मग त्यांनी हा व्यावसाय वाढविण्याचा ठरविले. सध्या तिन टॅंक वाढवून आज त्यांच्या जवळ ऐकून चार टॅंक आहेत. यातून ते वर्षाकाठी 6 ते 7 लाखांचा नफा यातून कमावत आहेत.
advertisement
खेकड्याना तसा खाद्यासाठी देखील खर्च येत नसल्याने हा व्यावसाय परवडतो. हॉटेल वेस्टेज आणि इतर मच्छि, कोंबडी वेस्टेज आठवड्यातून एकदा आम्ही खेकड्याना देतो. साधारणता एक खेकडा 250 ते 300 ग्रॅम पर्यत चार पाच महिन्यात वाढतो. हॉटेल व्यवसायांकांची या खेकड्याना मागणी देखील मोठी असते, असं दीपक तेली सांगतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
नोकरी सोडून धरली गावची वाट, गावी येऊन केले खेकडा पालन, वर्षांला आता 6 लाखांचा नफा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement