मक्याचे दर स्थिर, सोयाबीनमध्ये पुन्हा झाली वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video

Last Updated:

17 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये मंगळवारच्या तुलनेत काही शेतमालाची आवक कमी झाली. तर काहींत वाढ झाली. तसेच दरातही उलथापालथ झालेली दिसून येत आहे.

+
News18

News18

अमरावती : 17 डिसेंबर, बुधवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरात पुन्हा चढ-उतार झाले आहेत. आज बहुतांश बाजारांमध्ये शेतमालाची आवक देखील वाढलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे मका आणि कांद्याची आवक वाढली आणि दर स्थिर आहेत. तर सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली आणि दरात वाढ झालेली दिसून येत आहे. आज राज्याच्या कृषी मार्केटमध्ये सोयाबीन, कांदा आणि मका या तीन महत्त्वाच्या शेतमालांची आवक किती झाली? तसेच शेतकऱ्यांना दर किती मिळाला? हे पाहूयात सविस्तर
मक्याचे सर्वाधिक दर आजही स्थिर
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.00 वाजताच्या रिपोर्टनुसार, 17 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 38 हजार 730 क्विंटल इतकी झाली. आज मक्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक मार्केटमध्ये झालेल्या 7 हजार 835 क्विंटल हायब्रीड मक्यास प्रतीनुसार 1370 ते 1825 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आज मक्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 230 क्विंटल मक्यास किमान 2500 तर कमाल 3800 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मंगळवारी मक्याला मिळालेला सर्वाधिक बाजारभाव आजही स्थिर आहे.
advertisement
कांद्याची आवक किती झाली?
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 86 हजार 481 क्विंटल इतकी झाली. त्यातील 44 हजार 094 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. नाशिक बाजारात कांद्याला 461 ते 2778 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच कोल्हापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 4728 क्विंटल कांद्यास 4000 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी मिळालेला कांद्याचा सर्वाधिक भाव आजही स्थिर आहे. तर इतर बाजारांमध्ये मात्र दरात चढ-उतार झाल्याचे चित्र आहे.
advertisement
सोयाबीनच्या सर्वाधिक दरात काहीशी वाढ
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 44 हजार 256 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही लातूर मार्केटमध्ये झाली. लातूर मार्केटमधील 18 हजार 537 क्विंटल सोयाबीनला 3908 ते 4653 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 1688 क्विंटल सोयाबीनला 5750 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मक्याचे दर स्थिर, सोयाबीनमध्ये पुन्हा झाली वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement