IndiGo ने 31 डिसेंबरपर्यंत देशांतर्गत अनेक उड्डाणं केली रद्द, नवीन कारण समोर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
भारतातील विमानतळांवर धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय येत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिगो या विमान कंपनीने देखील पुण्यातील उड्डाणे रद्द केली आहेत.
भारतातील विमानतळांवर धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय येत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिगो या विमान कंपनीने देखील पुण्यातील उड्डाणे रद्द केली आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल कारणांमुळे, इंडिगोने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून येणाऱ्या काही नियोजित उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत.
विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नियोजित उड्डाणांमध्ये रद्द झालेल्या विमानांमध्ये गुवाहाटी-पुणे (6E 746) आणि पुणे-चेन्नई (6E 918), वाराणसी-पुणे (6E 6884) आणि पुणे-वाराणसी (6E 497), बेंगळुरू-पुणे (6E 6876) आणि पुणे- बेंगळुरू (6E.6877) या विमानांचा समावेश आहे. "डिसेंबर अखेरपर्यंत रद्द करण्याचे नियोजन आहे. या सेवा तात्पुरत्या स्थगितीमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही एअरलाइनसोबत समन्वय साधत आहोत," असे एएआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
"या विमानांमध्ये तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना पैसे परत मिळावेत किंवा विमान कंपनीच्या नियमांनुसार पर्यायी प्रवास पर्याय उपलब्ध करून द्यावेत, यासाठी आम्ही एअरलाइनशी सतत समन्वय साधत आहोत. जरीही काही नियोजित काळासाठी वेळापत्रक रद्द झाले असले तरी, प्रवाशांना त्याच्यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये असे आम्ही एअरलाइनला स्पष्टपणे कळवले आहे," असे पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके म्हणाले.
advertisement
"पुणे विमानतळावर उड्डाणांच्या हालचालींशी संबंधित कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी आणि घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. उड्डाण वेळापत्रकात कोणतेही बदल किंवा अतिरिक्त अपडेट अधिकृत माध्यमांद्वारा कळवले जातील," असे ढोके म्हणाले. एएआयने प्रभावित विमानांमध्ये बुक केलेल्या प्रवाशांना थेट इंडिगोशी संपर्क साधण्याचा किंवा रि- बुकिंग पर्यायी व्यवस्था किंवा परतफेडीची माहिती मिळविण्यासाठी एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲप्लिकेशनवर संपर्क साधण्याचा सल्ला दिला आणि प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती पुन्हा पुष्टी करण्यास सांगितले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:59 PM IST










