'धुरंधर'च्या तुफानामुळे 'इक्कीस'ने घेतला काढता पाय! थेट फिल्मची रिलीज डेटच बदलली, कधी येणार थिएटरमध्ये?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ikkis Movie Release Date Changed: आधी हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी सावध पाऊल टाकत या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच नावाचा बोलबाला सुरू आहे, आणि ते नाव म्हणजे रणवीर सिंगचा 'धुरंधर'! या चित्रपटाने चित्रपटगृहात असा काही भुकंप आणला आहे की, मोठमोठ्या निर्मात्यांना आता आपल्या चित्रपटांच्या तारखा बदलण्यासाठी विचार करावा लागत आहे. या 'धुरंधर' वादळाचा पहिला फटका बसला आहे तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या बहुप्रतिक्षित 'इक्कीस' या चित्रपटाला. आधी हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. पण आता निर्मात्यांनी सावध पाऊल टाकत या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
'इक्कीस'ची रिलीज डेट बदलली
चित्रपटसृष्टीत चर्चा आहे की, 'धुरंधर' ज्या वेगाने कमाईचे रेकॉर्ड मोडीत काढत आहे, त्यासमोर दुसरा कोणताही चित्रपट टिकणे कठीण आहे. 'धुरंधर' आणि 'इक्कीस' हे दोन्ही चित्रपट देशभक्ती या एकाच जॉनरचे आहेत. एकाच वेळी दोन मोठे सिनेमे समोरासमोर आले असते, तर त्याचा फटका थेट गल्ल्यावर झाला असता.
advertisement
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १९ डिसेंबरला हॉलिवूडचा मोठा चित्रपट 'अवतार' देखील प्रदर्शित होणार आहे. या दोन महाबलाढ्य चित्रपटांच्या कचाट्यात आपली वीरगाथा अडकू नये, यासाठी निर्मात्यांनी एक पाऊल मागे घेत चित्रपटाची नवी तारीख जाहीर केली आहे. आता हा सिनेमा १ जानेवारी २०२६ ला रिलीज होणार आहे.
#BreakingNews... DINESH VIJAN'S WISE MOVE – 'IKKIS' SHIFTS TO 1 JAN 2026...
⭐️ 2017: #HindiMedium smartly shifted to a later date once #Baahubali2 locked its release.
⭐️ 2024: #Chhaava avoided a direct clash with #Pushpa2 and moved to 2025.
The postponement of #HindiMedium and… pic.twitter.com/Oc1Ha9pZJn
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2025
advertisement
'इक्कीस' हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नाही, तर तो एका खऱ्या हिरोचा सन्मान आहे. भारताचे सर्वात कमी वयाचे परमवीर चक्र विजेते, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या अजोड शौर्यावर हा चित्रपट आधारित आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले, "काही नायक खूप कमी वयात अमर होतात. या नवीन वर्षात स्वतःला धैर्याची भेट द्या आणि १ जानेवारीला चित्रपटगृहात या शौर्याचा अनुभव घ्या."
advertisement
याआधीही बदलल्या चित्रपटांच्या रिलीज डेट
चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन हे आपल्या 'बिझनेस स्ट्रॅटेजी'साठी ओळखले जातात. हा काही पहिलाच वेळ नाही जेव्हा त्यांनी हा सेफ गेम खेळला आहे. २०१७ मध्ये त्यांनी 'हिंदी मीडियम'ला 'बाहुबली २' च्या टक्करपासून वाचवण्यासाठी तारीख बदलली आणि चित्रपट सुपरहिट ठरला. २०२४ मध्येही 'छावा' चित्रपटाचा 'पुष्पा २' सोबतचा क्लॅश टाळून तो २०२५ मध्ये रिलीज केला, जेणेकरून चित्रपटाला मोकळं मैदान मिळेल.
advertisement
विशेष म्हणजे, सस्पेन्स थ्रिलरचे बादशाह मानले जाणारे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा पहिलाच युद्धपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या वीकेंडला 'इक्कीस'चा फायनल ट्रेलर प्रदर्शित होणार असून, त्यातून सिनेमाची भव्यता स्पष्ट होईल. थोडक्यात सांगायचे तर, 'धुरंधर'च्या टक्करपासून स्वतःला वाचवत 'इक्कीस' आता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे हृदय जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'धुरंधर'च्या तुफानामुळे 'इक्कीस'ने घेतला काढता पाय! थेट फिल्मची रिलीज डेटच बदलली, कधी येणार थिएटरमध्ये?










