पुणे पोलिसांशी हुज्जत घालणे भोवलं, बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
छापेमारीच्या दिवशी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोन वकिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करत 22 लाख रुपयांची रोकड आणि एक बंदूक जप्त केली आहे. आंदेकर कुटुंब पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत होते. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या छापेमारीच्या दिवशी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या दोन वकिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. . निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली. आंदेकर कुटुंब निवडणुकीसाठी तयारी करत असून आंदेकरांच्या घरी पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत २२ लाखाची रोकड आणि एक बंदूक जप्त करण्यात आली. ही रोकड निवडणूक खर्चासाठी जमवण्यात आल्याचा संशय आहे. मात्र ज्यावेळी आंदेकरच्या घरी छापे टाकण्यात आले, त्यावेळी आंदेकरचे वकील देखील उपस्थित होते.
advertisement
छापेमारी करण्यासाठी आलेल्या पोलिसांना हाऊस सर्च परमिशन आहे का? असा जाब या वकिलांनी पुणे पोलिसांना विचारला होता. त्यावरून पोलीस आणि वकिलांमध्ये हुज्जत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी
मिथुन चव्हाण आणि प्रशांत पवार या आंदेकराच्या दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वर्चस्व
पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. कुटुंबातील काही सदस्य तुरुंगात असतानाही बंडू आंदेकर स्वतः पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत सक्रिय होता. निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक जमवा-जमव सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
आंदेकर कुटुंबाचा राजकीय दबदबा
पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिले आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्य वत्सला आंदेकर या काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. मध्ये त्यांनी पुणे शहराचे महापौरपद भूषवले. पुण्याचे तत्कालिन कारभारी सुरेश कलमाडी यांच्यावर दबाव आणून त्यांनी महापौरपद मिळविल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. वत्सला आंदेकर यांचे पुतणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर, आणि इतर सदस्यही नगरसेवक राहिले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:20 PM IST










