कपाशीवर लाल्या बघून घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? कोणती काळजी घ्यावी? याबद्दलच अमरावतीमधील कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताठोडे यांनी दिली आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अती पावसामुळे आधीच कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंड अळीने भर घातली. या नुकसानामधून अजून शेतकरी सावरलेला नाही. अशातच आता काही ठिकाणी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात? कोणती काळजी घ्यावी? याबद्दलच अमरावतीमधील कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताठोडे यांनी दिली आहे.
advertisement
कृषी तज्ज्ञ श्यामसुंदर ताठोडे यांनी सांगितले की, लाल्या हा रोग नसून कपाशी व्यवस्थापनामध्ये राहलेल्या कमतरतेचे लक्षण आहे. लाल्या येण्याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑक्टोबर हीट. ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरण हे दिवस रात्र दमट असते. त्यामुळे पाण्याची कमतरता होते. यामुळे सुद्धा लाल्या सदृश्य परिस्थिती निर्माण होते.
2 एकरमध्ये केली टोमॅटोची लागवड, सोलापूरमधील शेतकऱ्यानं मिळवलं 14 लाख रुपयांचं उत्पन्न
त्यानंतर काही शेतकऱ्यांनी खताचे नियोजन केले आणि मग कपाशी वर रस शोषण करणाऱ्या किडी आल्यात. मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे यासारखे किडे रस शोषून घेतात. याचे व्यवस्थापन न केल्यास सुद्धा लाल्या या रोगाची लक्षणे आपल्याला दिसतात. त्याचबरोबर या काळामध्ये अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन हे काळात अत्यंत गरजेचे आहे. यामुळे सुद्धा लाल्याचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो, असं श्यामसुंदर ताठोडे यांनी सांगितले.
advertisement
लाल्या का येतो?
आपल्या कपाशी पिकाच्या पानामध्ये अँथोसायनिन नावाचे लाल कण आतमध्ये लपलेले असतात. त्यावर चादरीसारखा हिरवा थर असतो. पण अन्नद्रव्याची कमतरता, पाण्याची कमतरता यामुळे ती हिरवी चादर निघून जाते आणि आतील लाल कण बाहेर दिसायला लागतात, यालाच आपण लाल्या म्हणतो. व्यवस्थापन जर व्यवस्थित केले तर लाल्या आपल्या कपाशीवरून निघून जाऊ शकतो आणि नवीन पाने हिरवीगार दिसू लागतात, असं श्यामसुंदर ताठोडे सांगतात.
advertisement
लाल्या रोगासाठी उपाययोजना कोणत्या कराव्यात?
ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीला पाण्याची कमतरता आहे. त्या शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत कपाशीला पाणी देणे गरजेचे आहे. त्यांनतर ज्या शेतकऱ्यांची कपाशी पिवळी पडली आहे. पानगळ होत आहे. अशा शेतकऱ्यांनी कपाशीला अन्नद्रव्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
फवारणी करत असाल तर पिकाच्या मुळाशी ओलावा असणे गरजेचे आहे. दमट वातावरण असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे रासायनिक, जैविक तुमच्या सोईनुसार कीटकनाशकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
कपाशी पिकाला दाटी होऊ नये यासाठी पिकातील अंतर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. लागवड करतांना या गोष्टीचे नियोजन करणे महत्वाचे आहे, असंही श्यामसुंदर ताठोडे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
October 09, 2024 7:11 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कपाशीवर लाल्या बघून घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

