शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यातून मयत व्यक्तीचे नाव कसं कमी करायचे? वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यात (जमाबंदी उतारा) अनेक वेळा अशा व्यक्तींची नावे कायम राहतात ज्यांचे निधन झालेले असते. यामुळे पुढील जमीन व्यवहार, वाटप किंवा कर्जप्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
मुंबई : शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यात (जमाबंदी उतारा) अनेक वेळा अशा व्यक्तींची नावे कायम राहतात ज्यांचे निधन झालेले असते. यामुळे पुढील जमीन व्यवहार, वाटप किंवा कर्जप्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. या समस्येवर तोडगा म्हणून महसूल विभागाने मृत खातेदाराचे नाव ७/१२ उताऱ्यावरून काढून टाकण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता वारसांना अतिरिक्त फेरफार किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियेत अडकावे लागणार नाही.
प्रक्रिया कशी करायची?
महसूल विभागाच्या नियमानुसार, जर मयत व्यक्तीचे कायदेशीर वारसांचे नावे आधीच सातबाऱ्यावर नोंदलेली असतील, तर फक्त मयत खातेदाराचे नाव वगळण्याची प्रक्रिया पुरेशी असते. या प्रक्रियेसाठी सर्व खातेदारांपैकी एक जिवंत व्यक्ती अर्ज करू शकतो.
अर्ज करताना केवळ “मयत व्यक्तीचे नाव सातबाऱ्यावरून वगळावे” असा उल्लेख करावा लागतो. ही प्रक्रिया दोन प्रकारे करता येते. तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन किंवा ई-हक्क पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतात.
advertisement
आवश्यक कागदपत्रे
मयत खातेदाराचा मृत्यू दाखला (मूळ किंवा प्रमाणित प्रत) वारस नोंद झालेल्या फेरफाराची प्रत, सर्व जिवंत वारसांच्या वयाचा पुरावा (साक्षांकित प्रत), सर्व वारसांच्या आधार कार्डच्या स्वसाक्षांकित प्रती, विहित नमुन्यातील शपथपत्र / स्वयंघोषणापत्र, सर्व वारसांचा सविस्तर पत्ता, संपर्क क्रमांक आणि आवश्यक तपशील.
दरम्यान, सातबाऱ्यावरून मयत खातेदाराचे नाव वगळणे ही एक लहान पण अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. यामुळे जमीन अभिलेखातील माहिती अचूक राहते आणि भविष्यातील व्यवहारांसाठी वारसांना कायदेशीर संरक्षण आणि स्पष्ट मालकी हक्क मिळतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 11:33 AM IST