ऐन थंडीत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, या तारखेपासून अवकाळी कोसळणार, रब्बी पिकांची काय काळजी घ्याल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीचा जोर वाढत असून,किमान तापमानात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पारा 10 ते 11 अंशांपर्यंत खाली आला आहे. सोमवारी रात्री काही भागात तापमान 19 अंशांवर होतं, तर मंगळवारी ते झपाट्याने घसरत 10 .5 अंशांवर पोहोचले. हवामान विभागानुसार बुधवारपासून किमान तापमान किंचित वाढेल, मात्र शनिवारपर्यंत वातावरणातील गारवा कायम राहणार आहे.
राज्यात थंडी वाढली
उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा प्रभाव थेट महाराष्ट्रावर जाणवत आहे. थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने रात्री आणि सकाळच्या वेळेत तीव्र गारठा जाणवत आहे. याचा परिणाम जनजीवनावरही होत असून, जालना शहरासह अनेक ठिकाणी सायंकाळनंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. दुपारीही उबदार कपड्यांची साथ आवश्यक बनली आहे.
23, 24 नोव्हेंबरला पाऊस
23 आणि 24 नोव्हेंबरला राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ शकते. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञ प्रा. पंडित वासरे यांनी सांगितले. त्यांच्या मते, पाऊस झाला तरी तो मर्यादित स्वरूपात असेल, मात्र यामुळे किमान तापमान वाढून काही दिवस थंडी कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरअखेरीस पुन्हा थंडीचे पुनरागमन होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
रब्बी पिकांची शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
थंडी आणि संभाव्य पावसाचा रब्बी पिकांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसे की,
गहू पिकासाठी सिंचनाचे नियोजन
गहू पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात थंडी लाभदायक असते. मात्र, अचानक तापमान वाढ-घट किंवा पावसामुळे मुळांना ओलावा जास्त मिळू शकतो. त्यामुळे पावसापूर्वी अनावश्यक सिंचन टाळावे.
advertisement
चणा आणि हरभरा पिकावर विशेष लक्ष
अचानक थंडी वाढल्यास हरभरा पिकाला फुलगुंड्या, मर आणि बुरशीजन्य रोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे पिकाची नियमित पाहणी करा. आवश्यक असल्यास प्रतिबंधात्मक फवारण्या करा.
पावसात खतांचा वापर टाळा
view comments23 व 24 नोव्हेंबरला पावसाचा अंदाज असल्यामुळे दोन दिवसांत नायट्रोजनयुक्त खतांची पेरणी टाळावी. यामुळे खत वाहून जाणे किंवा वाया जाणे टाळता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 1:37 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ऐन थंडीत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, या तारखेपासून अवकाळी कोसळणार, रब्बी पिकांची काय काळजी घ्याल?


