गायीच्या शेणाचा असाही उपयोग, तब्बल 20 पेक्षा अधिक उत्पादनांची केली निर्मिती, वर्षाला 4 लाखांची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गाईच्या मिळणाऱ्या शेणापासून काय काय बनवता येईल असा विचार सोलापूर शहरातील सोरेगाव येथील स्वास्तिक गोशाळेत करण्यात आला. या गोशाळेत गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, छोटे हवन कुंड, धूपकांड्या, देशी गायीचे तूप तसेच आदी वस्तू बनवल्या जात आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : गोवंश जगवण्यासाठी गोसंवर्धन अनेक जण करत आहेत. तसेच या गाईच्या मिळणाऱ्या शेणापासून काय काय बनवता येईल असा विचार सोलापूर शहरातील सोरेगाव येथील स्वास्तिक गोशाळेत करण्यात आला. या गोशाळेत गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, छोटे हवन कुंड, धूपकांड्या, देशी गायीचे तूप तसेच आदी वस्तू बनवल्या जात आहेत. गेल्या चार ते पाच वर्षापासून सुचित्रा गडद गोधन याविषयीची जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहेत.
advertisement
गाईच्या शेणाला किती महत्त्व आहे, याविषयी उलटसुलट चर्चा नेहमीच होत असते. कित्येकांना ते पटते तर अनेकांना त्यात तथ्य आहे, असे वाटत नाही. मात्र, गायीच्या उपयुक्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. हे सोलापूरच्या सुचित्रा गडद यांनी आपल्या स्वास्तिक गोशाळेत सिद्ध केले आहे.
advertisement
स्वास्तिक गोशाळेत गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करतात. एका गणेश मूर्तीची किंमत 500 रुपयांपर्यंत आहे. तसेच गायीपासून सेंद्रिय खत, देशी गायीचे तूप, पनीर, छोटे हवन कुंड, धूपकांड्या आदी वस्तू बनवल्या जात आहेत. गोमयपासून बनवलेल्या वस्तूंची विक्री करून सुचित्रा गडद या वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करत आहेत. गाईपासून मिळणाऱ्या शेणाला 500 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत ही विक्री करता येते हे सुचित्रा गडद यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 21, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
गायीच्या शेणाचा असाही उपयोग, तब्बल 20 पेक्षा अधिक उत्पादनांची केली निर्मिती, वर्षाला 4 लाखांची कमाई