Land Survey : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नवीन तंत्रज्ञानामुळे एका तासात एक हेक्टर जमीन मोजणी होणार

Last Updated:

jamin mojani : आधुनिक रोव्हर तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या एका तासात एक हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण होऊ लागल्याने अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली निघू लागली आहेत.

News18
News18
कोल्हापूर : आधुनिक रोव्हर तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या एका तासात एक हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण होऊ लागल्याने अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली निघू लागली आहेत. मात्र, भूमी अभिलेख कार्यालयात बिल्डर आणि मोठ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, तर शेतकऱ्यांच्या अर्जांकडे दुर्लक्ष होत आहे.
मोजणीच्या वाढलेल्या शुल्कामुळे शेतकरी हवालदिल
मोजणी प्रक्रियेतील गतिमानतेचा फायदा होण्याऐवजी, शुल्कात दुप्पट ते पाचपट वाढ झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतीचे लहान तुकडे होत असल्याने वाद वाढत आहेत, तर नागरीकरणामुळे शहरालगतच्या जमिनींवर नव्या इमारती, कॉम्प्लेक्स उभ्या राहत आहेत. परिणामी, जमिनीच्या सीमांकन प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शेतमोजणीच्या अर्जांमध्ये वाढ,पण यंत्रणा अपुरी
शहरालगतच्या शेतीच्या मोजणीसाठी दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगवान झाली असली तरी रोव्हर यंत्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात.
advertisement
नवे शुल्क किती?
मोजणीच्या नव्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे:
मोजणीचा प्रकार      मागील दर       नवीन दर
नियमित मोजणी      1,000              2,000
तातडीची मोजणी     3,000               8,000
दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी नियमित मोजणी ₹2,000, तर तातडीची 8,000 रुपये करण्यात आली आहे. दोन हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 2,000 रु द्यावे लागत आहेत.
दर महिन्याला हजारो अर्ज,पण निर्णय लांबणीवर
सध्या महिन्याला 1,200 ते 1,300 मोजणीसंबंधी अर्ज दाखल होत आहेत. मात्र, यंत्रणेची अपुरी संख्या आणि वशिलेबाजीमुळे सर्व अर्ज निकाली निघत नाहीत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Land Survey : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नवीन तंत्रज्ञानामुळे एका तासात एक हेक्टर जमीन मोजणी होणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement