PM Kisan च्या 20 व्या हप्त्याबाबत कृषी मंत्रालयाकडून महत्वाची अपडेट!

Last Updated:

PM Kisan 20 th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 20 व्या हफ्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, अद्यापही केंद्र सरकारकडून हफ्ता जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

pm kisan yojana
pm kisan yojana
मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 20 व्या हफ्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, अद्यापही केंद्र सरकारकडून हफ्ता जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे अनेक वेळा तारीख बदलत असूनही हफ्ता खात्यावर जमा होत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
या योजनेतून देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचे अनुदान तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20 व्या हप्त्यासाठी लाखो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. याबाबत अनेकदा 18,19 किंवा 20 जुलैला हफ्ता येईल, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या तारखा पार गेल्यानंतरही हफ्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
advertisement
सरकारचं स्पष्ट आवाहन
या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं आवाहन केलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावाखाली बनावट संदेश, लिंक, कॉल्स आणि अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावं आणि अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये.
फक्त अधिकृत पोर्टल आणि अकाउंटवरच विश्वास ठेवा, असं आवाहन करताना मंत्रालयाने सांगितलं की, 20 व्या हप्त्याची कोणतीही माहिती केवळ http://pmkisan.gov.in या पोर्टलवर किंवा @pmkisanofficial या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरच दिली जाईल.
advertisement
शेतकऱ्यांनी माहिती कशी मिळवायची?
आपला लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी http://pmkisan.gov.in वर जाऊन 'Beneficiary Status' वर क्लिक करावं. आधार क्रमांक, मोबाइल नंबर किंवा बँक खाती यामध्ये योग्य माहिती भरून तपशील पाहता येतो. मोबाइलवर आलेले कोणतेही बनावट लिंक, OTP मागणारे मेसेज किंवा बँक तपशील विचारणारे कॉल्स याकडे दुर्लक्ष करावं. आपल्या बँक खात्यावर पैसे जमा झालेत का हे तपासण्यासाठी बँक खात्याची नियमित तपासणी करावी.
advertisement
हफ्त्याबाबत लवकरच घोषणा अपेक्षित
20 व्या हप्त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आणि खात्रीलायक स्रोतांवरूनच माहिती घ्यावी.
दरम्यान, पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता अजून जाहीर झालेला नाही, पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांना बळी न पडता, अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी, असं केंद्र सरकारचे आवाहन आहे. शेतकऱ्यांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी ही काळजी अत्यावश्यक ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
PM Kisan च्या 20 व्या हप्त्याबाबत कृषी मंत्रालयाकडून महत्वाची अपडेट!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement