दिवाळीत PM Kisan चा २१ वा हप्ता खात्यात जमा होणार? समोर आली नवीन अपडेट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana : देशभरातील लाखो शेतकरी PM Kisan योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप काही राज्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही.
मुंबई : देशभरातील लाखो शेतकरी PM Kisan योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, अद्याप काही राज्यांना या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यातच आतापर्यंत हा हप्ता जमा करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे विशेष सवलत
केंद्र सरकारने या चार राज्यांतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे. कारण, गेल्या काही आठवड्यांत या भागात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळावा म्हणून केंद्राने २१ वा हप्ता वेळेपूर्वीच जारी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्रींची मोठी भेट
११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली. त्यांनी ४२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या कृषी योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. यामध्ये विशेषतः दोन महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
advertisement
या दोन्ही योजनांचा एकूण खर्च सुमारे ३५,४४० कोटी रु असून, यामुळे शेती उत्पादन वाढेल, देश डाळीमध्ये आत्मनिर्भर बनेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी जमा होणार?
२०२३ साली १५ नोव्हेंबरला हप्ता जारी करण्यात आला होता, तर २०२४ मध्ये ५ ऑक्टोबरला १८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. या पार्श्वभूमीवर २०२५ चा २१ वा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप निधी फक्त काही राज्यांनाच दिला गेला आहे.
advertisement
केंद्र सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी म्हणजेच २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत २१ वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो.
अन्यथा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही
view commentsसरकारने स्पष्ट केले आहे की, जर काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण नसेल, तर रक्कम खात्यात जमा होणार नाही. त्यामध्ये पुढील कारणांचा समावेश आहे. जसे की, ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाही, बँक खात्याचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक चुकीचा आहे.तसेच बँक खाते बंद आहे, नाव किंवा वैयक्तिक माहितीमध्ये चूक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 10:55 AM IST