अमेरिकेचा भारताला मोठा दिलासा! 10 कृषी उत्पादनांवरील टॅरिफ हटवला, यादी आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Ind vs America tariff war : अमेरिकेने अलीकडेच अनेक कृषी उत्पादनांवर लागू असलेल्या परस्पर करांमध्ये बदल करून काही वस्तूंना सूट दिली आहे.
मुंबई : अमेरिकेने अलीकडेच अनेक कृषी उत्पादनांवर लागू असलेल्या परस्पर करांमध्ये बदल करून काही वस्तूंना सूट दिली आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, या निर्णयामुळे भारताला अल्प स्वरूपात का होईना, पण महत्त्वाचा फायदा होऊ शकतो. विशेषतः कृषी क्षेत्रासाठी ही बातमी महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामुळे भारतीय शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
कोणत्या उत्पादनांवर मिळाली सूट
व्हाईट हाऊसने अनेक कृषी उत्पादनांवरील आयात शुल्कातून काही वस्तूंना सूट देण्याचा कार्यकारी आदेश जारी केला. ही सवलत 13 नोव्हेंबरपासून लागू झाली असून कॉफी, चहा, उष्णकटिबंधीय फळे, फळांचे रस, कोको, मसाले, टोमॅटो, केळी, संत्री, काही प्रकारची खते आणि गोमांस यांसारख्या वस्तू यामध्ये समाविष्ट आहेत. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की या वस्तू अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर तयार होत नाहीत किंवा त्यांच्या उत्पादनासाठी तेथील हवामान अनुकूल नाही. त्यामुळे देशांतर्गत उत्पादकांना नुकसान न होता या वस्तूंना सवलतीचा लाभ देता येऊ शकतो.
advertisement
GTRI च्या अहवालानुसार, अमेरिका दरवर्षी या वस्तूंची एकूण सुमारे 50.6 अब्ज डॉलर इतकी आयात करते. परंतु या मोठ्या बाजारात भारताचा सध्याचा वाटा केवळ 548 दशलक्ष डॉलर इतकाच आहे. भारत सध्या मुख्यत: मिरी, लाल मिरची पावडर, हळद, आले, कढीपत्ता, जिरे, बडीशेप, वेलची, जायफळ, चहा आणि नारळ यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो. यामध्ये काळी मिरी आणि लाल मिरचीचे प्रक्रिया केलेले पदार्थ यांची निर्यात सर्वाधिक असून ती 181 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. हळद, आले आणि इतर मसाल्यांची निर्यात 84 दशलक्ष डॉलर, तर चहाची निर्यात 68 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे.
advertisement
अहवालात हेही स्पष्ट झालंय की, भारतीय कृषी निर्यातीत अनेक मोठ्या श्रेणींचा अभाव आहे. उदाहरणार्थ टोमॅटो, लिंबुवर्गीय फळे, टरबूज, ताजी फळे आणि फळांचे रस यांसारख्या श्रेणींमध्ये भारताचे योगदान जवळपास नाहीच. ही अशी उत्पादने आहेत ज्यांची आयात अमेरिका सर्वाधिक करते. त्यामुळे या बाजारपेठांचा मोठा फायदा लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आसियान देशांना होण्याची शक्यता आहे.
advertisement
निर्यातीत वाढ होणार
view commentsभारतातील मसाले उत्पादक, विशेषतः दक्षिण आणि ईशान्य भारतातील शेतकरी, तसेच चहा आणि कोको उत्पादकांना या शुल्क सवलतीचा लगेच फायदा होऊ शकतो. जर भारतीय निर्यातदारांनी वेळ न दवडता अमेरिकन खरेदीदारांशी संपर्क वाढवला, पुरवठा साखळ्या सुधारल्या आणि उत्पादनांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठेवली तर निर्यातीत थोडीशी वाढ होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:02 AM IST


