मोठ्या भावाच्या नावावर जमीन, मालमत्तेचे खरेदी खत असल्यास ते लहान भावाच्या नावावर कसं करायचे?

Last Updated:

Property News : ग्रामीण भागात जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या-लहान भावांमधील नाव बदल, हक्क, हिस्से यावरून अनेकदा गोंधळ निर्माण होतो.

property rules
property rules
मुंबई : ग्रामीण भागात जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या-लहान भावांमधील नाव बदल, हक्क, हिस्से यावरून अनेकदा गोंधळ निर्माण होतो. विशेषतः जमीन खरेदीखत मोठ्या भावाच्या नावावर असताना ती जमीन लहान भावाच्या नावावर करता येते का? हा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये उद्भवतो. कायद्याच्या दृष्टीने हे शक्य आहे. परंतु त्यासाठी काही ठरावीक प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची गरज असते. यासंबंधी सर्व माहिती जाणून घेऊया.
जमीन एका भावाच्या नावावर असल्यास, दुसऱ्याच्या नावावर कशी करावी?
कायद्यानुसार, जमीन मालक ज्या व्यक्तीच्या नावावर खरेदीखत आहे, त्यालाच त्या जमिनीचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो. त्यामुळे मोठ्या भावाच्या नावावर खरेदीखत असेल तर जमीन त्याची समजली जाते. मात्र, मोठा भाऊ इच्छित असल्यास जमीन लहान भावाला देऊ शकतो.
तीन प्रमुख पर्याय कोणते?
1) खरेदीखत करून जमीन हस्तांतर हे सर्वात सामान्य आणि सुरक्षित पद्धत आहे. मोठा भाऊ लहान भावाला जमिनीसाठी खरेदीखत करून देतो. यासाठी दोन्ही भावांची उपस्थिती आवश्यक असते. सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणी होते. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी लागते. नोंदणी झाल्यानंतर जमीन कायदेशीररित्या लहान भावाच्या नावावर जाते ही प्रक्रिया कायदेशीर मानली जाते.
advertisement
२) हक्क त्यागपत्र कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन हस्तांतर करण्याची ही सोपी पद्धत आहे. मोठा भाऊ आपला जमिनीवरील हक्क स्वेच्छेने सोडतो. हे त्यागपत्र लहान भावाच्या नावावर केले जाते. नोंदणी कार्यालयात रजिस्ट्रेशन आवश्यक. स्टॅम्प ड्युटी कमी असते (राज्यानुसार बदलते) जमीन थेट लहान भावाच्या नावावर जाते. कुटुंबांतर्गत जमीन देण्यासाठी हे सर्वात जास्त वापरले जाते.
advertisement
दुसरीकडे, काही लोक विचार करतात की मोठा भाऊ जिवंत असताना जमीन लहान भावाच्या नावावर करता येईल का? तर याचं उत्तर 'हो'असं आहे. जमीन नावावर करता येते करता येते, पण वारसा हक्काद्वारे नाही. वारसा हक्क फक्त मालकाच्या मृत्यूनंतर लागू होतो. तोपर्यंत जमीन कोणालाही कायदेशीररित्या मिळू शकत नाही. त्यामुळे जिवंत असताना नाव बदलासाठी खरेदीखत किंवा हक्क त्यागपत्र हाच मार्ग आहे
advertisement
जमीन नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
मूळ खरेदीखत
7/12 उतारा व फेरफार नोंद
मालकाची ओळखपत्रे
जमीनमालकाचे संमतीपत्र
त्यागपत्र/खरेदीखत
स्टॅम्प ड्युटी भरल्याची पावती
सरकारी नोंदणीनंतरची प्रक्रिया काय?
नोंदणी झाल्यावर संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात mutation साठी (फेरफार) अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर जमीन महसूल नोंदीत नवे नाव घातले जाते. त्यानंतर नवीन 7/12 उतारा लहान भावाच्या नावावर मिळतो
advertisement
एकूणच, मोठ्या भावाच्या नावावर असलेली जमीन कायदेशीर मार्गाने लहान भावाच्या नावावर सहजपणे करता येते.परंतु त्यासाठी योग्य नोंदणी प्रक्रिया पाळावी लागते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मोठ्या भावाच्या नावावर जमीन, मालमत्तेचे खरेदी खत असल्यास ते लहान भावाच्या नावावर कसं करायचे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement