हराळवाडी गावातील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून पाच गुंठ्यात हिरवी मिरचीची लागवड करत आहेत. मिरची लागवडीपासून ते मशागतीपर्यंत पाच गुंठ्याला चार ते पाच हजार रुपये खर्च येत आहे. विशेष म्हणजे रासायनिक खताचा जास्त वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पाच फुटाचा बेड तयार करून हिरवी मिरचीची लागवड ज्ञानेश्वर यांनी केली आहे. तर सव्वा फुटावर एक मिरचीचे रोप लावलेले आहे.
advertisement
Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याने केली 900 झाडांची लागवड, पालटलं नशीब, वर्षाला लाखात कमाई, Video
सेंद्रिय पद्धतीने मिरचीची लागवड केल्या असल्यामुळे बाजारात देखील चांगला दर मिळत आहे. पाच गुंठ्यातून ज्ञानेश्वर यांनी 10 ते 15 बॅग मिरचीच्या विक्री केल्या असून आतापर्यंत त्यांना लागवडीचा खर्च वजा करून 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच ज्ञानेश्वर हिप्परकर हे स्वतः आठवडी बाजारात जाऊन हिरवी मिरचीची विक्री करत आहेत.
ज्ञानेश्वर हिप्परकर यांच्याकडे सहा एकर जमीन आहे. चार एकर वर उसाची लागवड केली आहे. तर उरलेल्या दोन एकरमध्ये दहा गुंठे आणि पाच-पाच गुंठे अशा पद्धतीने टोमॅटो, वांगी आणि हिरवी मिरचीची लागवड केली आहे. दहा आणि पाच-पाच गुंठ्यामध्ये पालेभाज्यांची लागवड करण्याचे एकच कारण, आठवडी बाजारात किंवा दररोज तोडा करून याची विक्री करता येते आणि रोजचा रोज उत्पन्न मिळते. जमिनीचे योग्य नियोजन करून पालेभाज्यांची पिकं घेतल्यास शेतकऱ्यांना उसाचे बिल हाती येण्याआधी पालेभाज्या विक्रीतून आपल्याला अधिकाधिक उत्पन्न मिळेल, असे मत ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी व्यक्त केले आहे.