पैठण येथे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मोरे हे केळीचे उत्पादन घेत आहेत. मात्र यंदा कडाक्याची थंडी पडल्यामुळे केळीची पाने अक्षरशः जळून गेली आहेत. केळी या पिकाला जास्त पाणी चालते मात्र थंडी हे पीक सहन करू शकत नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये साधारणतः दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गणेश मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
advertisement
काळ्या मातीची काळजी घ्या! PH असा राखा संतुलन, उत्पन्न वाढण्यास होईल मदत, सोप्या टिप्सचा Video
थंडीचे प्रमाण कमी असते तर केळीची झाडे चांगले पोसली असती त्यामुळे 15 ते 16 टन केळीचे उत्पादन निघाले असते आणि जवळपास 2 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, या शेतीसाठी सद्यस्थितीत रोप लागवड, ठिबक, खत-औषधांची फवारणी यासह एकूण खर्च 80 हजार रुपये झाला. बाजारात सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो भाव सुरू आहे, त्यामुळे खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाकडे देखील मागणी करून काही मिळत नाही मात्र शासनाने केळीच्या दरात भाववाढ करावी, अशी मागणी देखील मोरे यांनी केली.





