TRENDING:

Harbara Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. सध्या हे पीक रोप अवस्थेत आहे. या पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. सध्या हे पीक रोप अवस्थेत आहे. या पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यावर नियंत्रण कसे मिळवावे? याबाबतची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अनंत इंगळे यांनी दिली आहे.
advertisement

यावर्षी हरभरा पेरणी थोडी उशिरा झाली असून, शेवटी झालेल्या पावसाच्या ओलीवर पेरणी झाली आहे. काही ठिकाणी पेरणीला उशीर होत आहे. मागील आठवड्यात थंडी कमी असल्याने हरभरा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. आता पुन्हा थंडी वाढलेली आहे. पिकाची वाढ जरा कमी झाली आहे, तसेच बऱ्याच ठिकाणी मर रोग आणि कॉलर रॉटचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बीज प्रक्रिया केली असेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.

advertisement

Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्तीसाठी तिळ सुपरफूड, रोज खाल्ल्याने आणखी होतील हे फायदे, Video

हरभरा पिकामध्ये सुद्धा तो जेव्हा ढगाळ हवामान आणि ओली जमीन असेल तर जास्त प्रमाणात एक्सपोज होतो. जर हवामान चांगले असते, थंडी जास्त असेल तर प्रादुर्भाव होत नाही. या वर्षीच्या रब्बी हंगामात हवामान पोषक आहे परंतु ढगाळ वातावरण आहे किंवा थंडी अजून तरी कमी प्रमाणात आहे. या कारणाने आपल्याला हरभरा पिकामध्ये मर व कॉलर रॉट सारखे रोग दिसून येत आहेत.

advertisement

त्यासाठी शेतकरी ट्रायकोडर्मा विरिडीचे 3-4 किलो किंवा लिटर एकरी ड्रेचिंग करणे आवश्यक आहे किंवा गांडूळ खतासोबत मिक्स करून टाकू शकता. रासायनिक बुरशीनाशकांमध्ये:

कॉपर ऑक्सिक्लोराईड 300-400 gm किंवा

फॉसेटाइल अॅल्युमिनियम 250-300 gm किंवा

मेटॅलेक्झिल + मॅन्कोझेब 400 gm किंवा

क्लोरोथॅलोनिल + मेटॅलेक्झिल 250 मिली

कार्बेंडाझिम + मॅन्कोझेब (Sprint) 500 gm

यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक आणि सोबत थायामेथॉक्सम 30 एफएस 250 मिलीलीटर ड्रेचिंग करावी (ड्रेचिंग तुम्ही स्प्रिंकलर द्वारे करू शकता). किंवा जर जमीन ओली असेल तर वरील बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी सुद्धा करू शकता, परंतु फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळी करावी.  जमिनीमध्ये हरभरा पिकाच्या मुळीपर्यंत औषध जाईल याची काळजी घ्यावी.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चायनीज राईस आता बस्स! तुम्ही खाल्ला का पगार राईस, फक्त 70 रुपयांपासून! Video
सर्व पहा

तसेच जर आपले शेत ओले असेल तर कोळपणी आणि खुरपणी करावी जेणेकरून जमिनीमध्ये हवा खेळती राहील. ओलावा कमी झाला की बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अनंत इंगळे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Harbara Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल