TRENDING:

Turmeric Polishing : हळदीची चकाकी देईल उत्तम बाजार भाव, अशी करा पॉलिश अन् प्रतवारी, तुम्हाला फायदाच फायदा! Video

Last Updated:

चांगल्या बाजारभावासाठी हळकुंडाची जाडी, लांबी, चकाकी पाहिली जाते. शिजवलेली हळद 10 ते 12 दिवस उन्हात वाळवल्यानंतही तिची प्रतवारी, पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी 
advertisement

सांगली : सांगलीची हळद ही जगप्रसिद्ध हळद आहे. जीआय मानांकन असलेल्या सांगलीच्या हळदीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे. हळद पिकातून जिल्ह्यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. काढणी केल्यानंतर विक्रिपूर्वी हळदीवर काही प्रक्रिया केल्या जातात. यापैकीच अत्यंत महत्त्वाच्या आणि बाजारभावावर परिणाम करणाऱ्या हळद पॉलिश करण्याच्या प्रक्रियेविषयी हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून शास्त्रीय माहिती घेऊया.

advertisement

हळदीला चकाकी आणताना ही प्रक्रीया कशी होते? 

शिजवलेली हळद आधी 10 ते 12 दिवस

उन्हामध्ये वाळवावी. सुकवायला टाकलेल्या हळकुंडापैकी वाळलेले हळकुंड निवडावी.

ही हळकुंड लोखंडी टॅंकमध्ये टाकून त्यात 5 ते 7 अणूकुचीदार दगड घर्षणासाठी टाकले जातात. हळद शिजवताना हळदीवर मातीचा थर बसलेला असतो. त्यामुळे ती काळपट दिसते किंवा चिरते. हा वरचा मातीचा थर पॉलिश केल्यानंतर हळदीला चकाकी येते. यासाठी आधुनिक लोखंडी टॅंक वापरतात. टँकमध्ये हळद भरून त्याला गोलाकार फिरवले जाते. हा टॅंक गोलाकार मोटरच्या आधारे फिरवता जातो.

advertisement

केमिकल युक्त अगरबत्तीने दुखायचं मुलांचे डोकं, महिलेने सुरू केला गाईच्या शेणापासून अनोखा व्यवसाय, आता लाखोंची कमाई

हळद पॉलिश करण्याच्या सुधारित यंत्राला तीन प्रकारचे चाळे आहेत. या चाळ्यांमधून एक दोन व तीन नंबरची हळकुंड वेगळी करून मिळतात.

ही प्रकीया झाल्यावर हळकुंड पोत्यात भरून त्याचे वजन केले जाते.यानंतर हळद विक्रीसाठी तयार होते.

advertisement

हळदीची प्रतवारी

बाजारात हळद प्रतवारी करण्यासाठी विविध यंत्र उपलब्ध आहेत. या यंत्रांच्या वापरामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते. वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी केल्यानंतर चांगल्या बारदानामध्ये पॅकिंग करावे. यामध्ये सोरेगड्ढे आणि शिजवलेले गड्ढे हे वेगवेगळ्या ठिकाणी पॅक करावेत. हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात. त्यानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

advertisement

हळद पॉलिश केल्यानंतर हळकुंडाची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करावी.

जाड, लांब हळकुंडे (3 ते 5 सें.मी. लांबी)

मध्यम जाड हळकुंडे (2 ते 3 सें.मी. लांबी)

लहान आकाराची हळकुंडे (2 सें.मी. पेक्षा कमी लांबी) लहान माती व खडेविरहित कणी.

नेहमी लक्षात ठेवा

पॉलिश केलेली हळद माती किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नये. हळदीची चकाकी कायम राहिल्यास उत्तम बाजार भाव मिळण्यास मदत होते.

तसेच शिजवून वाळवलेली हळद विक्रीसाठी मार्केटला आणण्यापूर्वी दोन-चार दिवस आधी पॉलिश करावी. फार आधी पॉलिश केलेल्या हळदीची चकाकी कमी होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

सध्या हळदीला चांगला भाव मिळत असून अनेक भागात हळदीला पॉलिश करण्याची प्रक्रीया सुरु आहे. चांगल्या बाजारभावासाठी हळकुंडाची जाडी, लांबी, चकाकी पाहिली जाते. शिजवलेली हळद 10 ते 12 दिवस उन्हात वाळवल्यानंतही तिची प्रतवारी, पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते.

मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Polishing : हळदीची चकाकी देईल उत्तम बाजार भाव, अशी करा पॉलिश अन् प्रतवारी, तुम्हाला फायदाच फायदा! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल