जालना शहरात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होते. आठ दिवसांपूर्वीच बाजारात नवीन तूर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तुरीमध्ये सध्या आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने दर काहीसे कमी आहेत. परंतु आर्द्रता कमी झाल्यास तुरीला कमीत कमी 6000 तर जास्तीत जास्त 7200 रुपये दर मिळू शकतो, अशी शक्यता व्यापारी अशोक पाचफुले यांनी व्यक्त केली.
advertisement
दरम्यान, जालना बाजारपेठेत दररोज 200 क्विंटल तूर आवक होत आहे. आगामी काळात ही आवक 2000 ते 10000 क्विंटलपर्यंत वाढू शकते. बाजारात पांढऱ्या तुरीबरोबरच, लाल आणि काळी तूर देखील दाखल होत असते. काळ्या रंगाच्या तुरीला जास्त दर मिळतो. तर चारू तुरीला देखील बाजारात मागणी असते.
आपल्याकडे आज तूर खरेदीचा मुहूर्त करण्यात आला. आपल्याकडे आलेल्या लाल तुरीमध्ये 26 टक्के आर्द्रता होती. या तुरीला 5711 रुपये एवढा दर मिळाल्याचे व्यापारी पाचफुले यांनी सांगितले.





