TRENDING:

Success Story: बारावीपर्यंत शिक्षण, एका गाईपासून केली सुरुवात, आता महिन्याची कमाई 1 लाख!

Last Updated:

Milk Business: सोलापुरातील बारावीचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं स्वत:चा दुग्धव्यवसाय सुरू केला. एका गाईपासून सुरुवात केल्यानंतर त्याची महिन्याची कमाई एक लाखाच्या घरात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : सध्याच्या काळात काही तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळत आहेत. विशेष म्हणजे त्यातन ते चांगली कमाई देखील करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिरापूरच्या एका तरुणाने शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. प्रदीप ताकमोगे यांनी 13 वर्षांपूर्वी एका गाईपासून सुरुवात केली होती. आता त्यांच्याकडे 13 गाई असून महिन्याला 90 हजार ते 1 लाखांपर्यंत कमाई होतेय. याबाबत लोकल18 सोबत बोलताना ताकमोगे यांनी माहिती दिलीये.

advertisement

मोहोळ तालुक्यातील शिरापूरचे प्रदीप ताकमोगे यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालं. बारावीनंतरच नोकरी न करता शेतीशी निगडीत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला 2002 मध्ये कसायाकडून एक गाय घेऊन दूध व्यवसायाला सुरुवात केली. पुढे गाईंची संख्या वाढवत गेलो. आता एचएफ जातीच्या 13 गाई आहेत. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा त्यांच्या चाऱ्या पाण्याचं नियोजन केलं जातं, असं प्रदीप सांगतात.

advertisement

Agriculture : गावशिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल, Video

महिन्याची कमाई 1 लाख

“गाईंचं चांगल्या पद्धतीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं संगोपन केलं जातं. दोन वेळेला चारा-पाणी केलं जातं. त्यामुळे 13 गाईंपासून रोज 110 लिटर दूध निघतं. हे दूध मोहोळ तालुक्यातील अंकोली, आष्टी, इचगाव, कुरुल, तरटगावसह 10 गावांमध्ये विक्री केलं जातं. या दुधाच्या विक्रीतून महिन्याला 90 हजार ते 1 लाखापर्यंत उत्त्पन्न मिळतं. तसेच दुधाच्या दरांनुसार यामध्ये काही प्रमाणात कमी जास्त देखील होतं,” असं ताकमोगे सांगतात.

advertisement

दरम्यान, दूध व्यवसाय करणं तसं सोपं नाही. कष्ट करण्याची तयारी पाहिजे. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम असलं तरी त्यासाठी शारीरिक कष्टाची तयारी पाहिजे. कष्ट केल्यास या व्यवसायातून चांगलं फळ मिळू शकतं, असंही प्रदीप ताकमोगे सांगतात.

मराठी बातम्या/कृषी/
Success Story: बारावीपर्यंत शिक्षण, एका गाईपासून केली सुरुवात, आता महिन्याची कमाई 1 लाख!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल