अनवली गावातील तरुण शेतकऱ्याचे नाव संतोष मेटकरी आहे. एका एकरात 500 मोहगणी झाडांची लागवड केली त्यांनी केली आहे. एका झाडाची किंमत 75 रुपये इतकी आहे. एका एकरात या झाडांची लागवड 8 बाय 9 वर केली आहे. तर एका एकरात मोहगणी लागवडी साठी संतोष मेटकरी यांना 60 ते 70 हजार रुपये खर्च आला आहे.
advertisement
गावासाठी आदर्श! पतीच्या मृत्यूनंतर रूबीने दाखवली हिंमत, जिद्दीने केली शेती, वर्षाला कमवते 'इतके' लाख
या मोहगनी झाडांच्या लाकडाला मागणी चांगली आहे. मोहगनी झाडांच्या लाकडीचा वापर फर्निचर बनवणे, कॅबिनेटरी बनवणे तसेच इतर लाकडी वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या लाकडाचा वापार पाण्यातील जहाज बनवण्यासाठी सुध्दा वापर केला जातो. मोहगनच्या लाकडाला 100 वर्ष सुद्धा पाण्यात ठेवले तरी तो खराब होत नाही. हे झाड तयार होण्यासाठी 10 ते 13 वर्षाचा कालावधी लागतो. तर याची विक्री प्रति घनफूट 500 ते 600 रुपये दराने होते.
आधुनिक काळात मोहगनी झाडांची शेती शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरत आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता जमिनीचा वापर करून शेतकरी आज मोहगणी झाडांची शेती करत आहेत. 500 झाडांच्या विक्रीतून 60 ते 70 लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती तरुण शेतकरी संतोष मेटकरी यांनी दिली.