मक्याच्या दरात घसरण
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, 13 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषी मार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 15 हजार 135 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक नाशिक मार्केटमध्ये झाली. नाशिक मार्केटमधील 5 हजार 580 क्विंटल पिवळ्या मक्यास प्रतीनुसार 1371 ते 1825 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल लाल मक्यास कमीत कमी 2600 ते 2800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मक्याच्या सर्वाधिक दरात घट झाली आहे.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा कोल्ड वेव्हचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट
कांद्याची आवक घटली
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 04 हजार 860 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. त्यातील 23 हजार 820 क्विंटल उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 487 ते 2213 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 8130 क्विंटल पोळ कांद्यास 1000 ते 3285 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे.
सोयाबीनचे दर स्थिर
राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 35 हजार 665 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही जालना मार्केटमध्ये झाली. जालना मार्केटमधील 5 हजार 793 क्विंटल सोयाबीनला 3400 ते 5151 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 225 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजार भावात कुठलाही बदल झालेला नाही. तर इतर दरात वाढ झालेली दिसून येत आहे.





