दिवस चांगला असून प्रसिद्धी मिळेल, पण ती डोक्यात जाऊ देऊ नका. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिवस परीक्षा पाहणारा असेल. या काळात आरोग्याची काळजी घ्या. कामात-बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी निश्चित करण्यासाठी अनेक पर्यायांची चाचपणी करून पाहायला हवी. कष्टांचं फळ मिळेल.
Lucky Number : 4
Lucky Colour : Blue
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज अखेर कामाची दखल घेतली जाईल. बुधवारी तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल. दिवस यशाचा आहे. पण, डोकेदुखीची शक्यता आहे. रिलॅक्स व्हा. अधिक कष्ट घेतल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. नातं अधिक अर्थपूर्ण होईल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Violet
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
अडलेल्या कामात आता उच्चपदस्थ अधिकारी सहकार्य करतील. तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल. तुमच्या प्रयत्नांना दूरवरून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आहे. डोकेदुखी होऊ शकते. रिलॅक्स व्हा. कामात आलेला व्यत्यय हा काम पूर्ण होण्यातला मोठा अडथळा ठरेल. सुरुवातीच्या काही अडथळ्यांनंतर नातं सुरळीत असेल.
Lucky Number : 11
Lucky Colour : Lavender
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी कामात सकारात्मकता आणि स्वतःबद्दलचा विश्वास यांमुळे दिवस चांगला जाईल. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. बऱ्याच काळाच्या टेन्शननंतर तुम्हाला आज ऊर्जावान वाटेल. तुमचा आकर्षकपणा काम करू लागेल. आर्थिक परिस्थिती चांगली आहे. बुध ग्रह अशा स्थितीत नेईल, की तुम्ही तुमची कर्जं फेडू शकाल. जोडीदाराच्या आक्रमक स्वभावामुळे ताण येऊ शकतो.
Lucky Number : 4
Lucky Colour : Pink
अहंकाराचा वारा न लागो..! तुमच्या राशीला साडेसाती कधी? 2050 पर्यंतची शनिची चाल
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज नवे मित्र बनवणं फायद्याचं ठरेल. दिवसभर जास्त काम करावं लागू शकतं. त्यामुळे खूप थकाल. मदतीचे प्रस्ताव स्वीकारताना सावध राहा, अनपेक्षित फसवणुकीची शक्यता आहे. वाढत्या खर्चांना पुरतील एवढे पैसे उभारण्याची चिंता तुम्हाला सतावेल. जोडीदार प्रेमाचा वर्षाव करील.
Lucky Number : 6
Lucky Colour : Blue
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी कुटुंबात-भावंडांशी चांगले संबंध राहतील. आज जे वाद टाळता येतील ते टाळा. फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्या. खर्च वाढतील. त्यामुळे बचतीच्या पैशांना हात घालावा लागू शकतो. रिलेशनशिपमध्ये जवळीक वाढवण्याची इच्छा असेल, तसे प्रयत्न कराल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Yellow
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
लोकांचे सहकार्य मिळेल, कुटुंब-नातेवाईकांमध्ये भावंडं मदत करणारी आहेत. आज बुधवारी छोट्या प्रयत्नांतून मोठा लाभ मिळतो. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधाल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. हलकं खा. शेअर मार्केट किंवा लॉटरीतून पैसे मिळतील. जोडीदाराशी भांडणांमुळे विनाकारण टेन्शन येईल.
Lucky Number : 18
Lucky Colour : Red
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्ही बऱ्याच काळापासून ज्याची वाट पाहत होतात, ते रेकग्निशन तुमच्याकडे चालून येत आहे असं वाटतं. आयुष्यात आरामदायक सुखं असावीत ही इच्छा दिवसभर कायम राहील. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा उच्च स्थानी आहे. त्यामुळे शक्तिशाली वाटत आहे. प्रमोशनसाठी तुमचा विचार होऊ शकतो. ब्लाइंड डेटला जाणं ही चांगली कल्पना असू शकत नाही.
Lucky Number : 7
Lucky Colour : Peach
दिवाळीच्या दोन दिवस आधी गुरू उजळवणार 3 राशींचे नशीब; आनंद-सुखात दुप्पट वाढ
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज बुधवारी कामं होतील, स्थानिक अधिकाऱ्यांकडे प्रलंबित काम पुढे सरकेल. तुमचा प्रभाव उदयाला येईल, वाढेल. जास्त कोलेस्टेरॉल असलेलं अन्न खाऊ नका. फळं, भाजीपाला अधिक खा. आजच्या दिवसासाठी अनेक प्लॅन्स आखले आहेत आणि ते बऱ्यापैकी पूर्ण होतील. विवाहबाह्य संबंधांत अडकू शकाल.
Lucky Number : 22
Lucky Colour : Indigo