जया एकादशीचा उपवास आणि मुहूर्त - वैदिक पंचांगानुसार, एकादशी तिथी 28 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल आणि 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, व्रत आणि पूजन 29 जानेवारी रोजी केले जाईल. पारण किंवा व्रत सोडण्यासाठी 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटे ते 9 वाजून 20 मिनिटे ही वेळ शुभ आहे. द्वादशी तिथी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 9 मिनिटांपर्यंत राहील. हरी वासर म्हणजेच विष्णूंच्या विश्रांतीची वेळ संपल्यानंतरच पारण करणे शास्त्रात सांगितले आहे.
advertisement
जया एकादशी व्रताचे लाभ - जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांना सर्व पापांतून मुक्त करतात. यामुळे मानसिक शांती, सुख-समृद्धी आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. दरिद्रतेचा नाश होऊन भूत-प्रेत बाधांपासून मुक्ती मिळते. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले होते की, ही एकादशी आत्म्याला नीच योनीतून मुक्त करते.
एकादशीला काय करू नये?
एकादशीच्या दिवशी पूर्ण सात्विकता पाळणे गरजेचे आहे. लसूण, कांदा, मांस आणि मद्यपानाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे. या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत आणि दाढी करणे टाळावे. दिवसा झोपू नये, कोणावर राग करू नये, खोटे बोलू नये आणि हिंसेपासून दूर राहावे. आहारात मसूर डाळ, मध, वांगी, कोबी, गाजर, शलजम आणि पालक खाणे टाळावे. तांदळाचे सेवन करू नये आणि तांदूळ दानही करू नये. विशेष म्हणजे तुळशीचे पान तोडू नये आणि तिला स्पर्श करू नये. तुळस माता सुद्धा या दिवशी व्रत ठेवते असे मानले जाते, त्यामुळे तिला पाणी घालणेही टाळावे. ब्रह्म मुहूर्तावर उठावे पण दात घासण्यासाठी दातवण किंवा मंजन वापरू नये आणि पान खाऊ नये.
एकादशीला काय करावे?
फळांमध्ये केळी, सफरचंद आणि द्राक्षे यांचे सेवन करता येते. याशिवाय दूध, दही, पनीर आणि साबुदाणा खाण्यास हरकत नाही. कुट्टू किंवा शिंगाड्याच्या पिठाचा वापर फराळासाठी करता येतो. शक्य असल्यास मिठाशिवाय भोजन करावे. पूर्ण दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन-कीर्तन किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा.
पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
