TRENDING:

ShaniDev: जरा नव्हे साडेसात वर्षांची पिढा टळणार! शनिच्या कचाट्यातून ही रास सुटल्यात जमा

Last Updated:

ShaniDev: साडेसातीचा तिसरा टप्पा सहसा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा कमी वेदनादायक असतो, त्यावर शनीचा चांदीचा पाय देखील असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत, हा काळ कुंभ राशीसाठी आराम आणि स्थिरता घेऊन आला आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून तो 3 जून 2027 रोजी संपेल. परंतु, शनि साडेसातीचा हा टप्पा कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल, कारण या राशीत शनि चांदीच्या पायांनी चालत आहे. शनिदेव जन्म राशीपासून दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या घरात भ्रमण करतो तेव्हा त्याला शनीचे चांदीचे पायाने चालणार, असे म्हणतात.
News18
News18
advertisement

शनिची ही स्थिती अत्यंत शुभ मानला जाते आणि त्यामुळे व्यक्तीला अचानक धन लाभ होतो, तसेच सुखसोयींमध्ये वाढ, व्यवसायात यश, पदोन्नती आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील 2 वर्षे कशी राहणार आहेत ते जाणून घ्या.

साडेसातीचा तिसरा टप्पा सहसा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा कमी वेदनादायक असतो, त्यावर शनीचा चांदीचा पाय देखील असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत, हा काळ कुंभ राशीसाठी आराम आणि स्थिरता घेऊन आला आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता किंवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण होऊ शकते.

advertisement

सप्टेंबर महिना या 3 जन्मतारखांचे लोक गाजवणार; कामात जबरदस्त ग्रोथ, धनवर्षाव

कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे मिळतील आणि गुंतवणुकीला फायदा होईल. तथापि, या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल कारण साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात अनावश्यक खर्च लक्षणीयरीत्या वाढतात. २०२५ ते २०२७ पर्यंत, कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, पगार वाढ आणि व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजारात किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून जोरदार फायदा होईल.

advertisement

कुंभ राशीच्या लोकांनी हे उपाय करावेत -

या काळात कुंभ राशीच्या लोकांनी शनीचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे किंवा बूट आणि चप्पल दान करावेत. शनिवारी हनुमान चालीसा, सुंदरकांड किंवा बजरंग बाणाचे पठण करावे. सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि झाडाला प्रदक्षिणा करावी.

advertisement

अहंकाराचा वारा न लागो..! तुमच्या राशीला साडेसाती कधी? 2050 पर्यंतची शनिची चाल

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
ShaniDev: जरा नव्हे साडेसात वर्षांची पिढा टळणार! शनिच्या कचाट्यातून ही रास सुटल्यात जमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल