घरी किंवा मंदिरात करण्याचा विधी -
श्रावण सोमवारी उपवास करून शंभू शंकराची पूजा केली जाते. पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील पूजास्थान स्वच्छ करा आणि भगवान शिव-पार्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा. सर्वात आधी गणपतीची पूजा करून पूजा सुरू करा. शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध आणि साखर यांचे मिश्रण (पंचामृत) अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र, धतुरा, फुले आणि भस्म अर्पण करा. चंदन, फूलमाळा, जानवे आणि वस्त्र अर्पण करा. तुपाचा दिवा लावून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करा. शिव-पार्वतीची आरती करा आणि प्रसाद वाटून घ्या, श्रावण सोमवारची व्रत कथा ऐकावी. उपवास ठेवावा, दिवसभर फलाहार करणे उत्तम मानले जाते.
advertisement
श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व - श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत-उपवास केल्यानं शंभू-महादेव लवकर प्रसन्न होतात. असे मानले जाते की हे व्रत केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. अविवाहित मुलींना चांगला वर मिळण्यासाठी आणि विवाहित स्त्रियांना सुखी आणि समृद्धीसाठी हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. याशिवाय श्रावणात सोमवारचे व्रत केल्याने अकाली मृत्यू आणि अपघाताचे भय दूर होते, अशीही धार्मिक श्रद्धा आहे.
तीन पिढ्यांमध्ये घरात अशी घटना घडल्यास त्रिपिंडी श्राद्ध! अडचणींच्या मुळावर घाव
श्रावण महिन्याचे महत्त्व - संपूर्ण श्रावण महिना हा शंभू-शंकराला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त उपवास करून शिवलिंगावर जलाभिषेक करतात. बेलपत्र, धोत्रा, फुले आणि दूध अर्पण करून शिवशंकराला प्रसन्न केले जाते. श्रावण महिना पावसाळ्याच्या मध्यभागी येतो, त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. यामुळे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण साजरे होतात. श्रावण महिन्यात अनेक लोक उत्सफूर्तपणे मांसाहार आणि तामसिक आहार टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करतात. यामुळे शरीराची शुद्धी होते, असे मानले जाते.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)