TRENDING:

Pitru Paksha 2025: स्वप्नात दिसणारे हे 4 प्राणी पूर्वजांच्या अतृप्ततेचे संकेत; पितृदोषाचे त्रास होण्याची भीती

Last Updated:

Pitru Paksha 2025 : पितृपक्षाच्या काळात लोकांना स्वप्नात वेगवेगळे प्राणी दिसण्याचे काही संकेत मानले जातात. ज्योतिष आणि शास्त्रांमध्ये पूर्वजांच्या नाराजीचे किंवा संदेशाचे ते लक्षण मानले जाते, ही स्वप्ने केवळ...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पितृपक्ष हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा काळ मानला जातो. हा काळ आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि कुटुंबासाठी पुण्य मिळविण्यास विशेष महत्त्वाचा आहे. पितृपक्षाच्या काळात लोकांना स्वप्नात वेगवेगळे प्राणी दिसण्याचे काही संकेत मानले जातात. ज्योतिष आणि शास्त्रांमध्ये पूर्वजांच्या नाराजीचे किंवा संदेशाचे ते लक्षण मानले जाते, ही स्वप्ने केवळ कल्पनारम्य नसून आपल्या कर्माशी आणि पूर्वजांच्या अपेक्षांशी संबंधित असतात, असे मानले जाते. जर श्राद्ध आणि तर्पण योग्यरित्या केले जात नसेल तर हे संकेत आणखी काळजी वाढवणारे ठरतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

1. पितृपक्षात सापाचे स्वप्न

स्वप्नात साप दिसणं हे नेहमीच काही संकट किंवा त्रासाचे प्रतीक मानले गेले आहे. पितृपक्षाच्या काळात स्वप्नात साप दिसला तर याचा अर्थ म्हणजे पूर्वज तुमच्यावर क्रोधित आहेत. तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध किंवा तर्पण योग्यरित्या केले नसल्यामुळे असे होऊ शकते. असे स्वप्न दिसत असल्यास आपल्या कर्मांविषयी काळजी घ्यावी आणि जर काही चुकीचं होत असेल तर त्यात दुरुस्ती करावी.

advertisement

2. पितृपक्षात कावळ्याचे स्वप्न

कावळा पूर्वजांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो, परंतु पितृपक्षात स्वप्नात कावळा दिसणं शुभ मानलं जात नाही. याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज अद्याप समाधानी नाहीत आणि त्यांचा आत्मा शांतीच्या शोधात फिरत आहे. असं स्वप्न दिसणं म्हणजे तुम्हाला श्राद्ध आणि तर्पण कर्माकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ते थेट पूर्वजांच्या अपेक्षा आणि आशीर्वादांशी संबंधित आहेत.

advertisement

3. पितृपक्षात मांजरीचे स्वप्न

पितृपक्षात मांजरीचे स्वप्न अशुभ आणि इशारा देणारे मानले जाते. पितृपक्षात स्वप्नात मांजर दिसल्यास ते पूर्वजांच्या नाराजीचा संकेत असू शकते. कधीकधी मांजरीला रडताना पाहणे हे भविष्यात मोठ्या घटनेचे संकेत देखील देते. अशा वेळी, पितृ दोष मुक्तीसाठी उपाय करणे आणि विशेष पूजा करणे खूप महत्वाचे असते.

advertisement

मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं अधोगतीचे कारण, प्रगतीच्या वाटेत विघ्न येतं

4. पितृपक्षात गिधाडाचे स्वप्न

गिधाडाचे स्वप्न सर्वात गंभीर मानले जाते. ते मृत्यू, बदल आणि गंभीर काही तरी घडण्याचा संकेत आहे. असं स्वप्न पितृपक्षात दिसलं तर त्याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर क्रोधित आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाही. तर्पण किंवा श्राद्ध विधीत काहीतरी चूक होत आहे किंवा कुटुंबात श्राद्ध कर्म नीट होत नसेल. अशा स्वप्नांना गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि पूर्वजांच्या आनंदासाठी विशेष पूजा, तर्पण किंवा श्राद्ध केले पाहिजे.

advertisement

लॉस अपयश मानसिक ताण..! सगळ्यातून बाहेर पडणार; चतुर्ग्रही योग 3 राशींना लकी ठरेल

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitru Paksha 2025: स्वप्नात दिसणारे हे 4 प्राणी पूर्वजांच्या अतृप्ततेचे संकेत; पितृदोषाचे त्रास होण्याची भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल