शनिदेव म्हणजे साक्षात..
शनिदेव हे सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र आहेत. हिंदू मान्यतेनुसार, शनिदेव हे कर्मांचा हिशोब ठेवणारे देवता आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांच्या आधारे फळ किंवा दंड देतात. यामुळेच अनेक लोक शनिदेवांना घाबरतात, परंतु सत्य हे आहे की जर एखादी व्यक्ती योग्य मार्गावर चालली, सत्याने आपले जीवन जगली आणि शनिदेवाची पूजा केली तर घाबरण्याची गरज नाही.
advertisement
शनिदेवांच्या नावांचे महत्त्व-
शनिदेवांच्या विविध नावांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. त्यांच्या प्रत्येक नावाचा प्रभाव आणि शक्ती वेगळी असते. असे मानले जाते की, या नावांचा नियमित जप केल्यानं मनातील नकारात्मकता दूर होते. यामुळे मन शांत राहते, आरोग्य सुधारते, आर्थिक स्थिती चांगली होते आणि कामात यश मिळू लागते.
दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ
शनिदेवांची 10 पवित्र नावे -
शनिदेवांची 10 विशेष नावं आहेत, त्यांचा शनिवारी जप करणे खूप फायदेशीर मानले जाते:
कोणस्थ - हे नाव शनिदेवांची शक्ती दर्शवते.
पिंगल - हे नाव त्यांच्या सौम्य स्वरूपाचे प्रतीक आहे.
बभ्रू - याचा अर्थ तप आणि भक्तीचे स्वरूप आहे.
कृष्ण - हे नाव शनिदेवांचा गडद रंग आणि तेज दर्शवितो.
रौद्रांतक - त्याच्या उग्र आणि न्यायप्रेमी स्वभावाचे सूचक आहे.
यम - कारण शनिदेव यमराजाचा भाऊ आहे.
सौरी - हे नाव त्याला सूर्यदेवाचा पुत्र असल्याचे दर्शवते.
शनिश्चर - त्याच्या मंद गतीशील स्वभावाचे सूचक आहे.
मंद - हे नाव त्याच्या शांत आणि स्थिर स्वभावाचे सूचक आहे.
शनि - त्याचे मूळ नाव, जे प्रत्येक संकटाचा अंत मानले जाते.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय -
शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता:
सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि शनिदेवाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावा. दिव्यात मोहरीचे तेल घाला आणि त्यात काळे तीळ घाला. सकाळी आणि संध्याकाळी शनिदेवाच्या या 10 नावांचा जप 108 वेळा करा. शनिवारी उपवास करा आणि गरजूंना काळे कपडे, काळे चणे किंवा तेल दान करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून सात फेरे मारा.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)