गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) आणि दुर्गा विसर्जन (विजयादशमी) मधील फरक -
गणेश चतुर्थीनंतर सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे १० दिवसांनी अनंत चतुर्दशी विसर्जन केले जाते. पण, नवरात्रामध्ये ९ व्या दिवशी (नवमी) किंवा १० व्या दिवशी (विजयादशमी/दसरा) दुर्गा देवीचे विसर्जन केले जाते.
गणेश मूर्तीतील देवत्व (प्राणशक्ती) पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन करणे. (कारण पार्थिव मूर्तीची पूजा ठराविक काळासाठीच केली जाते.) तर देवी जी नऊ दिवस पृथ्वीवर (माहेरी) वास करायला आली होती, तिला कैलास पर्वतावर (सासरी) परत पाठवणे, यासाठी विधी केले जातात. घटस्थापना केलेले घट हलवले जातात.
advertisement
विसर्जन विधींमधील फरक -
गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी किंवा ठरलेल्या दिवशी केले जाते. विसर्जनापूर्वी गणपतीची षोडशोपचार पूजा (सोळा उपचारांनी पूजा) पुन्हा केली जाते. गणपतीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते. 'आवाहनम् न जानामि न जानामि विसर्जनम्' या मंत्राचा जप करून कळत नकळत झालेल्या चुकांसाठी गणपती बाप्पाकडे क्षमा मागितली जाते. "ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥" (माझी पूजा स्वीकारून सर्व देवगण परत आपल्या स्थानी जावोत आणि माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत यावेत.) या मंत्राने मूर्तीवर अक्षता वाहून मूर्तीतील देवत्वाला निरोप दिला जातो. यानंतर मूर्ती तिच्या मूळ आसनावरून (पाटावरून) थोडी पुढे सरकवली जाते (याला 'उत्थापन' म्हणतात). काही घरांमध्ये बाप्पाला दही-भात किंवा लाडूची शिदोरी (पुढच्या प्रवासासाठीचा खाऊ) सोबत दिली जाते. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' अशा गजरात बाप्पाला पाण्यात (नदी, तलाव किंवा कृत्रिम हौद) विसर्जन करूननिरोप दिला जातो.
खडतर काळातून बाहेर! 2046 पर्यंत या राशीच्या लोकांना चिंता नाही, एकमार्गी प्रगती
दुर्गा विसर्जनाचा विधी -
दुर्गा विसर्जन हे नवमी किंवा विजयादशमी (दसरा) दिवशी केले जाते. नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या सकाळी देवीची अंतिम पूजा केली जाते. तिला नवीन वस्त्र, अलंकार आणि नैवेद्य (कडाकणी/घावन) अर्पण केले जातात. देवीचे आणि घटाचे पुन्हा पूजन करून क्षमा प्रार्थना केली जाते. गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थानम् परमेश्वरी। पूजाराधनाकाले च पुनरागमनाय च॥ (हे परमेश्वरी, तू आता परत आपल्या स्थानी जा; आणि पुढील पूजेसाठी पुन्हा ये.) हा मंत्र म्हणून घटावर अक्षता वाहून घट उचलला जातो (हलवला जातो).घटावर ठेवलेला नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटला जातो. घटस्थापनेसाठी पेरलेल्या जवाच्या रोपांची (निर्माल्य) पूजा करून त्यांना नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित केले जाते. काहीजण हे जव घरात किंवा तिजोरीत शुभ म्हणून ठेवतात. घटाला बांधलेला लाल धागा (कलावा) रक्षा कवच म्हणून हातावर बांधला जातो. मूर्तीची स्थापना केली असेल, तर गणपती विसर्जनाप्रमाणेच तिचे पाण्यात विसर्जन केले जाते. घटाखालील तांदूळ/धान्य जमा करून ते घरातल्या धान्यात मिसळले जातात किंवा त्याची खीर करून प्रसाद म्हणून वाटली जाते.
दुर्गा देवीची 108 नावं माहीत आहेत का? नवरात्रीच्या पूजेवेळी करावा जप
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)