वट पौर्णिमेला स्त्रिया वडाची पूजा करतात. जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे, असा हेतू त्यामागे असतो. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणल्याची, कथा पुराणात सांगितली जाते. यामुळे या दिवशी वडाची पूजा केली जाते. वडाला हिंदू धर्मात वटवृक्ष म्हणून ओळखे जाते, वडाला पवित्र वृक्ष म्हणूनही ओळखलं जातं. वडामध्ये ब्रह्मा , विष्णू आणि महेशाचा वास असल्याचे सांगितले जाते. महिला आपलं सौभाग्य आणि आंनदमय वैवाहिक जीवनासाठी वटपौर्णिमेला पूजा करतात. या दिवशी महिला एकत्र वडाची पूजा करतात. यंदा वडाची पूजा 11.35 नंतर करणं शुभफळदायी असेल.
advertisement
सत्यवान सावित्रीची कथा - सावित्रीच्या तपश्चर्येमुळे तिने यमराजाला प्रसन्न करून घेतले. सावित्री बुद्धिमान होती चतुर होती. तिने ‘सासूसास-यांना पुन्हा दृष्टी लाभावी ‘यासाठी पहिला वर मागितला. ‘सास-यांचे गेलेले राज्य पुन्हा मिळावे ‘ असा दुसरा वर मागितला. आपल्याला पुत्र व्हावा, असा तिसरा वर मागितला. प्रत्येकवेळी यमराज तथास्तु म्हणाले. नंतर यमराजाना आपली चूक कळून आली. सावित्रीच्या तपश्चर्येचे तेज , तिची पतिनिष्ठा व प्रेम पाहून यमराजही चकित झाले. त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी सत्यवानाचे प्राण पुन्हा त्याच्या शरीरात घातले. सत्यवान जिवंत झाला. सासूसास-यांना पुन्हा दृष्टी आली. त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले. सावित्रीला आनंद झाला. सावित्रीने स्वत:च्या तपश्चर्येने -सामर्थ्याने सर्व गोष्टी मिळविल्या होत्या.
वटपौर्णिमा पूजा-विधी
वट पौर्णिमेचा व्रत उपवास ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठून, आंघोळ करा, लाल किंवा पिवळ्या रंगाची कपडे-साड्या घाला. यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायला जावे, झाडाच्या मुळाशी पाणी घाला आणि त्याच्याभोवती कच्चे सूत गुंडाळा. पूजा केल्यानंतर वडाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी.
थोडी नव्हे खूप दिवस वाट पाहिली! या राशींचा आता सुवर्णकाळ; शनीकडून कष्टाचं शुभफळ
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून श्रृंगार परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, आंबा, हळदी-कुंकू यांसारखे गोष्टी ठेवा. वडाच्या झाडावर पाणी टाकून सूत बांधत 7 वेळा प्रदिक्षिणा मारा.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. सौभाग्य निरंतर लाभावे यासाठी आशीर्वाद घ्या.
वट सावित्री व्रताचे नियम -
हिंदू धर्मात वडाचे महत्त्व सांगितले आहे. महिलांनी या दिवशी सोळा अलंकार करावेत. या व्रतानंतर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे. वट पौर्णिमेचे व्रत सामूहिकरित्या केल्यानं त्याचा आनंद आणखी मिळतो. आज आधुनिक काळात आपल्या पत्नीसाठी पुरुषांनीही व्रत पूजा करावी.
शनि जयंतीच्या अगोदर दुप्पट लाभ! सूर्यदेव नक्षत्र बदलणार, फायदा 4 राशींना होणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)