वटवृक्ष दीर्घायुषी असतो आणि त्याची मुळे खोलवर पसरलेली असतात, ती एका मजबूत कुटुंबाचे प्रतीक मानली जाते. तसेच, वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचा वास असतो, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे.
वट पौर्णिमा २०२५ तिथी - द्रिक पंचांगानुसार, वट पौर्णिमेसाठी आवश्यक असलेली ज्येष्ठ पौर्णिमेची तिथी १० जून रोजी सकाळी ११:३५ वाजल्यापासून सुरू होत आहे आणि ती ११ जून रोजी दुपारी १:१३ वाजेपर्यंत वैध असेल. उदयतिथीच्या आधारावर वट पौर्णिमेचे व्रत मंगळवार, १० जून रोजी साजरे केले जाईल.
advertisement
वट पौर्णिमा २०२५ मुहूर्त - १० जून रोजी, वट पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ०४:०२ ते ०४:४२ पर्यंत आहे. दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५३ ते दुपारी १२:४९ पर्यंत आहे. अभिजीत मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करणे सौभाग्यदायी मानले जाते. वट पौर्णिमेच्या व्रताची पूजा रवि योगात होणार, त्यादिवशी रवि योग सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहील.
निंदकांचा जळफळाट! वक्री शनी आणि गुरूचा उदय या राशींची चौफेर प्रगती करेल
३ शुभ योगांमध्ये वट पौर्णिमा - यावेळी वट पौर्णिमेच्या दिवशी ३ शुभ योग तयार होत आहेत. वट पौर्णिमेला सिद्ध योग, साध्य योग आणि रवि योग तयार होतील. रवि योग सकाळी ०५:२३ ते संध्याकाळी ०६:०२ पर्यंत असेल. रवि योगात सर्व प्रकारचे दोष दूर करण्याची क्षमता असते. त्या दिवशी सिद्ध योग सकाळपासून दुपारी १:४५ पर्यंत असेल, त्यानंतर साध्य योग तयार होईल, तो रात्रीपर्यंत राहील. अनुराधा नक्षत्र वट पौर्णिमेला सकाळी ६:०२ पर्यंत असेल त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र असेल.
२०२५ च्या वट पौर्णिमेला स्वर्गाची भद्रा - वट पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळ असून त्याचे निवासस्थान स्वर्गात आहे. भद्रकाळ सकाळी ११:३५ पासून सुरू होऊन रात्री उशिरा १२:२७ पर्यंत असेल. त्याचा पृथ्वीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. म्हणजेच आपण त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू शकता.
घरात पोछा मारण्याची ही 100% चुकीची पद्धत; या दिशेकडून इकडे पुसत यायला पाहिजे
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)